सांगली : उमदी विश्रामशाळेतील १०० विद्यार्थ्याना अन्नातून विषबाधा | महातंत्र
उमदी , महातंत्र वृत्तसेवा : येथील समता अनुदानित (VJNT साठीची) आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांना रविवारी (दि. २७)रात्री उशिरा अन्नातून विषबाधा (food poisoning) झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून २० विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय / रुग्णालय, मिरज येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

माडग्याळ, जत व मिरज तिन्ही ठिकाणी डॉक्टरांना तात्काळ व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मा. जिल्हाधिकारी यांनी घटनेची माहिती व दखल घेतली असून, विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना त्यांनी मेडिकल कॉलेजची यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. तसेच, मा. जिल्हाधिकारी यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण यांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून २४ तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *