जम्मू-काश्मीरची 16 वर्षीय तिरंदाज शीतल आदर्श उदाहरण: जन्मत: हात नसल्याने पायच झाली ओळख; आशियाई पॅरा गेम्समध्ये 2 सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

शफक शाह | श्रीनगर5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

“एक दिवस माझे पाय मला ओळख मिळवून देतील असे मला वाटत नव्हते,’ हे उद्गार आहेत जम्मू-काश्मीरची पॅरा ॲथलिट शीतलदेवीचे. तिने नुकतेच आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. १६ वर्षांची तिरंदाज फोकोमेलियाने आजारी आहे. ही एक दुर्मिळ जन्मजात स्थिती असून अवयव विकसित होणे रोखले जाते.

Related News

शीतल आशियाई पॅरा गेम्स २०२३ च्या एका प्रकारात दोन सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. शीतलसाठी हा मार्ग सोपा नव्हता. तिला हात नसल्यामुळे खूप असुरक्षित वाटत होते. ती म्हणते की, पहिल्यांदा शाळेत गेले तेव्हा लोकांच्या नजरा आणि सहानुभूती पाहून वाईट वाटले होते. आपणास एका सामान्य मुलीप्रमाणे पाहावे,अशी तिची इच्छा होती. तिले वेगळे ट्रिट केल्याबद्दल घृणा होती. जम्मूच्या किश्तवाड जिल्ह्याच्या लोइधर भागात राहणाऱ्या शीतलचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी आहे. तिला एक भाऊ व बहीण आहे. शीतलचे वडील मानसिंह म्हणाले, २०२१ मध्ये शीतलने किश्तवारमध्ये भारतीय लष्कराच्या एका युवा स्पर्धेत भाग घेतला. लष्कराच्या मदतीने त्यांनी शीतलला बंगळुरूला घेऊन गेले. तेथे प्रीती नावाच्या महिलेची भेट झाली आणि त्यांनी खेळाची ओळख करून दिली. यानंतर शीतलमध्ये खेळाची आवड निर्माण झाली.पंतप्रधान शीतलच्या यशाचे वर्णन करतात तेव्हा तिला सामान्य यशस्वी व्यक्तीसारखे वाटते. शीतल इतरांसारखे नसल्याबद्दल नेहमी देवाकडे तक्रार करत होती. मात्र, आता देवाचे आभार मानते.

जेवण, लिहिणे व टाइपसाठी पायांचा वापर करत होती

शीतल पायाने जेवणे, लिहिणे, खेळणे आणि टाइप करत होती. ती सर्वकाही एक सामान्य व्यक्ती हाताने जसा वापर करते तसा पायाचा वापर करत होती. एक दिवस तिचे पाय सुवर्णपदक मिळवून देतील असा कुणीही विचार केला नव्हता.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *