19वी आशियाई स्पर्धा हांगझोऊ: ​​​​​​​आशियाईच्या उद्घाटन सोहळ्यात परंपरा व आधुनिकतेचा मेळ, स्पर्धेत ज्योत पेटवण्यासाठी होलोग्रामचा वापर

  • Marathi News
  • Sports
  • Asian Opening Ceremony Combines Tradition And Modernity, Uses Holograms To Ignite Competition

दिव्य मराठी नेटवर्क, हांगझोऊ4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ऑलिम्पिक स्पोर्ट््स सेंटर स्टेडियमवर पार पडला, ज्यामध्ये परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण दिसून आले. स्टेडियमच्या मध्यभागी राष्ट्रगीत वाजवले जात होते आणि त्याचे चित्रमय चित्रण स्क्रीनवर दाखवले जात होते. खेळातील तिन्ही शुभंकर रोबोट्सच्या रूपात सामील होते. चीनच्या पारंपरिक नृत्यानंतर अनेक कलाकारांनी एआयच्या मदतीने सादरीकरण करून प्रेक्षकांना चकित केले. खेळाडूंच्या मार्चपास्टमध्ये अफगाणिस्तानचा संघ सर्वप्रथम पोहोचला.

Related News

नेपाळ व ताजिकिस्तानवर सहज विजय, टेटे संघ बाद फेरीत दाखल

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत भारतीय टेबल टेनिस संघांनी चमकदार कामगिरी केली. महिलांनी नेपाळचा, तर पुरुषांनी ताजिकिस्तानचा ३-० असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघ आपापल्या गटामध्ये अव्वल स्थानावर राहिले आहेत.

हॉकीत भारताचा पहिला सामना आज

आशियाई चॅम्पियनशिपमधील विजयासह आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रवेश केलेल्या भारतीय हॉकी संघाचाही प्रवास रविवारी उझबेकिस्तानविरुद्ध होईल. मुख्य प्रशिक्षक फुल्टन यांनीही आशिया क्रमांक-१ बनून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नेमबाजीत महिलांची चाचणी होईल. रविवारी १० मीटर एअर रायफल व १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धा होईल. महिला बॉक्सिंगमध्ये ५०, ५४, ५७, ६० किलो व पुरुष बॉक्सिंगमध्ये ६३.५, ८०, ९२ किलोचे सामने आहेत.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *