दुसरा टी-20 सामना: विंडीज संघाचा सलग दुसरा विजय; 2 गड्यांनी भारतावर केली मात, तिलकचे पहिले अर्धशतक

दिव्य मराठी नेटवर्क | प्रोव्हिडेन्स4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतीय संघासाठी उद्या ‘करा वा मरा’ चा सामना

Related News

सामनावीर निकोल्स पुरन (६७), हुसेन (२/२९), अल्झारी जोसेफ (२/२८) आणि शेफर्डने (२/२८) शानदार खेळी करत यजमान विंडीज संघाची मालिकेतील विजयी मोहिम कायम ठेवली. यातून विंडीज संघाने घरच्या मैदानावर रविवारी दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर मात केली. विंडीज संघाने १८.५ षटकांमध्ये २ गड्यांनी विजय मिळवला. तिलक वर्माच्या (५१) अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने विजयासाठी यजमान विंडीज टीमला १५३ धावांचे टार्गेट दिले होते.

प्रत्युत्तरामध्ये विंडीज संघाने ८ गड्यांच्या माेबदल्यामध्ये विजयश्री खेचून अाणला. यासह यजमान विंडीज संघाने सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. यातून विंडीज संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील तिसरा टी-२० सामना उद्या मंगळवारी हाेणार अाहे. सलगच्या दाेन पराभवाने अडचणीत सापडलेल्या भारतासाठी हा करा वा मरा असा सामना अाहे.

निकाेलस पुरनचे अर्धशतक :

धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीज संघाचीही निराशाजनक सुरुवात झाली हाेती. मात्र, संघाला सामनावीर निकाेलस पुरनने सावरले. त्याने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्याने ४० चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार अाणि ४ उत्तंुग षटकरातून ६७ धावांची खेळी केली.

हार्दिक, चहलची खेळी व्यर्थ :

भारतीय संघाच्या विजयासाठी कर्णधार हार्दिक अाणि युजवेंद्र चहलने शानदार गाेलंदाजी केली. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. यादरम्यान हार्दिकने ३ अाणि युजवेंद्र चहलने २ गडी बाद केले.

तिलकचे अर्धशतक :

सलामी सामन्यातून पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने सलग दुसरा सामनाही गाजवला. त्याने ४२ चेंडूंमध्ये ५ चाैकार व १ षटकारातून ५१ धावांची खेळी केली. यासह त्याने पहिले टी-२० अर्धशतक नाेदंवले.

चहलचा गोलंदाज कुलदीप यादववर कौतुकाचा वर्षाव

दिव्य मराठी नेटवर्क | जॉर्जटाऊन

युवा गोलंदाज कुलदीप यादवने दर्जेदार खेळीतून आपली गुणवत्ता सिद्ध केली. तसेच त्याने निवड समितीने दाखवलेल्या विश्वासालाही सार्थकी लावले. त्याची सलामीच्या टी-२० सामन्यातील कामगिरीही लक्षवेधी ठरली. यामुळे त्याला आता सरस खेळीमुळे संधी मिळत आहे, अशा शब्दांमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाज युजवेंद्र चहलने सहकारी कुलदीप यादववर कौतुकाचा वर्षाव केला.

या दोघांचीही यजमान विंडीज संघाविरुद्ध सलामीच्या टी-२० सामन्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली होती. मात्र, यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. युजवेंद्र चहलने यंदाच्या १६ व्या सत्रातील आयपीएलनंतर पहिला टी-२० सामना खेळला. त्याला उशिराने संधी मिळाली. मात्र, त्याने याच संधीला सार्थकी लावत सलामीला दोन बळी घेतले.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *