मराठा आंदोलनाचा राजकीय पक्षांना दणका; बीडमध्ये ठाकरे गटाच्या 36 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटला असून, सकल मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. दरम्यान, आता याचा फटका राजकीय पक्षांना देखील बसतांना पाहायला मिळत आहे. कालच खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला असतांना, आज बीड जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत मराठा आरक्षणाला आणि जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केजमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाच्या तालुकाप्रमुखासह इतर 36 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. केजचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले होते. त्यानंतर थोरात यांच्यासह इतर 36 पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुकाप्रमुख शाखाप्रमुख आणि सर्कल प्रमुख यांचा समावेश आहे. 

Related News

आपल्या हस्ताक्षरात स्वेच्छेने राजीनामे दिले.

29 ऑक्टोंबर रोजी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देऊन युवा सेना, शिवसेना, वाहतुक सेना पदाधिकाऱ्यांनी आंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी अन्नपाणी त्यागून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्याचे एकमताने ठरले. तसेच युवासेना तालुकाप्रमुख, वाहतुक सेना तालुकाप्रमुख, युवासेना विधानसभा प्रमुख, शिवसेना उपशहरप्रमुख, शिवसेना व युवासेना उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, सर्कलप्रमुख, शाखाप्रमुख असे एकूण 36 पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृह केज येथील बैठकीत पक्षाच्या पदाचे आपल्या हस्ताक्षरात स्वेच्छेने राजीनामे दिले. 

यांनी दिले राजीनामे… 

युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, सुधीर जाधव, ज्ञानेश्वर बोबडे, के बबलु इंगळे, शिवसेना उपशहरप्रमुख पप्पु ढगे, अनिरुद्धा मुळे, अमोल चौधरी, राहुल जाधव, विशाल गायकवाड, चंद्रकांत चटप, शिवाजी थोरात, सुरज सौंदणे, नंदकिशोर चौधरी, प्रदीप काळे, सागर जाधव, परमेश्वर साखरे, विश्वास राऊत, लखन सौंदणे, सतिश अंबाड, सुरज चौधरी, विशाल अंबाड, दिपक करपे, आकाश चटप, किशोर जाधव, सागर जाधव, शिवाजी बोबडे, स्वप्निल थोरात, ज्ञानेश्वर बोराडे, शरद इंगळे, सुनिल बप्पा जाधव, भाऊ शिंदे, कचरु थोरात, अशोक थोरात, सतिश कोकाटे, आदित्य कोटुळे, शाम गव्हाणे, विजय बोबडे, संतोष बोबडे, विठ्ठल बोबडे, नवनाथ क्षीरसागरसह पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वेच्छेने राजीनामे दिले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठा आरक्षण पेटलं! मराठवाड्यात 12 बस फोडल्या, आष्टीत तहसीलदाराची गाडी पेटवली

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *