पुणे5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
व्यवसायिकाला खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 64 वर्षीय वयवासायिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदय पोवार (वय-40 रा. कर्मभुमीनगर, लोहगाव, पुणे), शब्बीर शेख (रा. आळंदी-धानोरी रोड, बुद्ध विहार जवळ, विश्रांतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 13 जुलै 2023 दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वडगावशेरी येथील पंपींग स्टेशन येथे फिर्यादी यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्यांनी फिर्यादी यांच्याकडून आतापर्य़ंत 25 हजार रुपये रोख आणि 5 हजार रुपये युपीआयद्वारे असे एकूण 30 हजार रुपये घेतले आहेत.आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पुन्हा खंडणीची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर शब्बीर शेख याने फिर्यादी यांचा चालक राजाराम मधोळकर यांच्या फोनवर फोन करुन फिर्यादी यांना व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देली.
आरोपींनी एका वृत्तवाहिनीवर खोटी बातमी दाखवली. तसेच वृत्तपत्रामध्ये 14 जुलै रोजी वृत्त देऊन फिर्यादी यांची खोटी बदनामी केली.त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत शिवाजीनगर न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात धाव घेतली. न्यायालयात सुनावणी झाल्यावर कोर्टाच्या आदेशानुसार सीआरपीसी कलम 156(3) नुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत येरवडा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड पुढील तपास करीत आहेत.