बनावट कागदपत्रांद्वारे वाईन शॉप परवाना केला दुसऱ्याच्या नावावर: वकिलासह पाच जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पुणे शहरातील कल्याणीनगर येथील एका वाईन शॉप संदर्भातील परवाना संगनमत करून बनावट व खोटी कागदपत्रे दुसऱ्याच्या नावावर केल्या प्रकरणी तसेच राज्य शासन आणि राज्य उत्पादन शुल्क यांची फसवणूक केल्याप्रमाणे एका वकिलासह पाच जणांवर बंडगार्डन पोलीस ठाणे येथे आर्थिक फसवणूक आणि बनावट कागदपत्र बनवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुणे राज्य उत्पादन शुल्क पोलिस उपाधीक्षक संतोष जगदाळे (वय- 50, राहणार -पिंपळे सौदागर, पुणे) यांनी आरोपी विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वकील पंकज अरविंद वाडीकर (राहणार- नारायण पेठ, पुणे), दिलीप ग्यानीन ( रा.- घाटकोपर, मुंबई ), पंकज खुल्लर (रा. – वरळी, मुंबई), वेंकटेश कोटलवार तसेच अनोळखी बनावट व्यक्ती रमेश बापूरावजी पदमवार यांच्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना 15/ 6 /2022 ते 17 /8 /2022 या दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत रमेश पदमवार (राहणार चंद्रपूर) यांनी राज्य उत्पादन शुल्क पुणे या /ठिकाणी तक्रारी अर्ज केला होता की, त्यांचे वडील रमेश बापूरावजी पदमवार यांच्या नावे पुण्यातील कल्याणीनगर याठिकाणी असलेल्या मे. व्हीनस वाईन्स या दुकानाचा विहक्टरी कल्याणी नगर, पुणे येथे परवाना मंजूर आहे. मात्र, संबंधित आरोपी यांनी संगनमत करून बनावट व खोटी कागदपत्रे बनवून अनोळखी बनावट व्यक्ती रमेश बापूराव पदमवार असे भासवून मे . व्हीनस वाईन्स या दुकानाच परवाना लालचंद मानकनी व प्रदीप लालचंद मानकनी यांच्या नावे वर्ग करून शासनाची व राज्य उत्पादन शुल्क पुणे यांची फसवणूक केली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक एस पवार पुढील तपास करत आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *