सुट्यांचा आनंद द्विगुणित करण्याची संधी: सुट्यांची पर्वणी; पर्यटन स्थळे गजबजणार; निसर्ग प्रेमींना खुणावतेय पावसाळा ऋतूमधील पर्यटन

अकोला44 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

नरनाळा अभयारण्य हे मेळघाट अभयारण्याचे दक्षिणद्वार म्हटले जाते.

  • त्रितोंडी कुंड, पुरातन वास्तू

ऑगस्ट महिन्यात सुट्यांची पर्वणी चालून आली आहे. स्वातंत्र्य दिन, पारसी नूतनवर्ष, नागपंचमी आणि रक्षाबंधन यामुळे सुट्यांमध्ये मोठी भर पडली आहे. यातच स्वातंत्र्य दिवसाच्या सुट्या लागून आहेत. यामुळे पावसाळा ऋतूमध्ये पर्यटन निसर्ग प्रेमींना खुणावत आहे. अकोला जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देऊन सुट्यांचा आनंद द्विगुणित करण्याची संधी पर्यटकांना आहे.

Related News

अकोट येथील नरनाळा अभयारण्य

अभयारण्यातील नरनाळा किल्ला स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. परिसरात २२ तलाव आहेत. घनदाट जंगलात वाघ, बिबट, अस्वल, तडस, काळवीट, हरण, कोल्हा, लांडगे असे प्राणी दिसतात. विविध प्रजातींचे वृक्ष, तसेच पक्ष्यांचा वावर येथे आहे. जंगल सफारीची व्यवस्था व निवासाची व्यवस्था वन विभाग अकोटकडून करण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन बुकिंग मॅजिक मेळघाट.ईन संकेतस्थळावर किंवा उपवन संरक्षक अकोट येथे करता येते.

येथे खोलेश्वर मंदिर, महाकालीचे पुरातन मंदिर आहे. मंदिरातील नक्षीकाम अप्रतिम आहे. तालुक्यात पिंजर येथे पुरातन व भव्य अशी पायरी विहिर आहे. काटेपूर्णा अभयारण्य तेथून जवळच आहे. तेथे निसर्ग परिचय केंद्र आहे. निवासी सूटमधून धरणाचे दर्शन अत्यंत मनोहारी आहे. मुलांना खेळण्याकरता गार्डन आहे. वनभ्रमंतीकरता सफारीची सोय आहे. पातूर जाताना नंदापूर फाटा लागतो. येथून २ किमी पुढे जंगलात टेकडीवर त्रितोंडी कुंड आहे. पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसताना पहाडावर तीन कुंड भूमिगत आहेत. आत उतरण्यास पायऱ्या आहेत.

अतिशय शांततापूर्ण आणि प्रसन्न करणारे हे ठिकाण आहे. रेणुकादेवी, नानासाहेबांचे पुरातन मंदिर, माळराजुरा निसर्ग पर्यटन केंद्र, दोधानी धबधबा, जैन मंदिर, झरंडी येथील सिता न्हाणी पहाडात वसलेले मंदिर आहे. तसेच महान येथील काटेपूर्णा आणि वारी हनुमान येथील हनुमानसागर प्रकल्पालाही भेट देता येते.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *