शिवसनेच्या माजी खासदार आणि आमदार यांच्यातील वाद पेटला; उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

Udhhav Thackrey : शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षसंघटनेसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यासोबतच  उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीची देखील तयारी सुरु केली आहे. मात्र, उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर जोरदार खडाजंगी झाली. उद्धव ठाकरे यांच्यासमोरच माजी खासदार आणि आमदार भिडले आहेत. 

उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच

शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाला आहे.  माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध माजी आमदार, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.  भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव गटातून उमेदवारी घोषित करताच माजी मंत्री बबनराव घोलप यांची मातोश्रीवर धाव घेतली. 

बबनराव घोलप यांच्या उमेदवारीला भाऊसाहेब वाकचौरे यांचा विरोध 

बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध केला आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या  सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. मात्र, उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे आज मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेऊन घोलप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Related News

देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौ-यावरुन उद्धव ठाकरे आणि भाजपत जुंपली

देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौ-यावरुन उद्धव ठाकरे आणि भाजपत जुंपली आहे. राज्यात दुष्काळ असताना फडणवीस जपान दौ-यावर गेल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. तर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंप्रमाणे परदेशात आराम करायला गेले नव्हते असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आयोजनाचं यजमानपद शिवसेना ठाकरे गटाकडे 

मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडतेय. पाटणा आणि बंगळुरुनंतर इंडिया आघाडीची ही तिसरी महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीच्या आयोजनाचं यजमानपद शिवसेना ठाकरे गटाकडे आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट नियोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडेल. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह राहुल गांधी, नितीशकुमार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती असे दिग्गज नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीपूर्वी एक दिवस म्हणजे 30 ऑगस्टला याच बैठकीसंबंधी मविआची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे ही पत्रकार परिषद घेणार आहेत. 

 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *