कामाख्या देवीचे भव्य मंदिर मुंबईत उभारणार: तर महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’ गुवाहाटीत; आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची माहिती

  • Marathi News
  • National
  • Kamakhya Devi In Mumbai And Janata Raja Drama Play In Guwahati Hemanta Biswa Sarma | CM Eknath Shinde, Maharashtra Politics 

मुंबई / गुवाहाटी41 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षात बंडखोर आमदारांचे सर्वात महत्त्वाचे केंद्रस्थान बनलेल्या गुवाहटीतील कामाख्या देवीचं मंदिर राजधानी मुंबईत होणार आहे. तर, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देणारे ‘जाणता राजा’ हे लोकप्रिय झालेले महानाट्याचे प्रयोग संपूर्ण आसाम राज्यात होणार आहे. यासंदर्भात खुद्द आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी माहिती दिली.

Related News

महाराष्ट्रातील विविध दैनिक व माध्यमांच्या पत्रकारांचे शिष्टमंडळ सध्या आसाम दौऱ्यावर असून त्यांनी मुख्यमंत्री शर्मा यांची भेट घेतली. यावेळी, शर्मा यांनी महाराष्ट्र व आसाम राज्यातील सलोख्याच्या संबंधांवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

गुवाहाटीच्या सौंदर्यांची महाराष्ट्राला ओळख

महाराष्ट्रातील राजकीय बंडात आसाममधील निसर्ग सौंदर्याचं कथन करणारा, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… हा डायलॉग महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ह्या डायलॉगमुळे गुवाहाटीचे सौंदर्य महाराष्ट्रात सर्वत्र पसरले. तर, राजकीय बंड यशस्वी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी येथील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शनही घेतले होते. या दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांच्यांशी संवाद झाला होता. त्यातील काही बाबी आज माध्यमांच्या प्रतिनिधींकडे बोलताना मुख्यमंत्री शर्मा यांनी माहिती दिली.

‘जाणता राजा’चे प्रयोग करण्याचा निर्धार

मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले की, शिवाजी महाराजांचा आदर्श घेत आसाममधील लोकांनी मुघल शाहीला आसाममध्ये पाऊल ठेऊ दिले नाही. त्याच प्रेरणेतून येथील गावागावात जाणता राजा नाटकाचे प्रयोग करण्याचा आचच्या सरकारचा निर्धार आहे.

दोन्ही राज्याची संस्कृती जोपासली जाणार
तसेच, महाराष्ट्रात आसाममधील हजारो नागरिक पोटा-पाण्यासाठी राहतात, ते महाराष्ट्रावर खूप प्रेम करतात. तसेच, आसाममध्येही मराठी माणूस राहत असून येथील महाराष्ट्र मंडळाने गुवाहटीत महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीसही दोन्ही राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचेही शर्मा यांनी म्हटले. त्यामुळे, लवकरच दोन्ही राज्याची संस्कृती, परंपरा आणि राजकीय सलोखा राखण्याची अनेक महत्त्वपूर्ण कामे पूर्णत्त्वास येतील, असे दिसून येत आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *