नाशिककर खड्ड्यांमुळे त्रस्त, खड्ड्याने घेतला कामगाराचा बळी: अंबड लिंकरोडवर घटना; दुसऱ्या घटनेत मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू

सातपूर42 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

नाशिककर खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत तरी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अखेरीस सातपूरला एका कर्मचाऱ्याचा खड्ड्याने बळी घेतला. अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिराजवळून ४१ वर्षीय राजकुमार सिंग हे दुचाकीवरून (एमएच १५ सीपी २७०८) जात असताना रस्त्यावरील खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात ते घसरले आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या आयशरखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला.

Related News

पाऊस कमी झाला असला तरी जो काही पाऊस आला त्यामुळे अनेक मोठ्या रस्त्यांची दैना झालेली दिसते. त्यातच गॅस पाइपलाइनसाठी खोदलेले खड्डे वरवर बुजविल्याने त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे होऊ लागले आहेत. यामुळे खड्ड्यांत दुचाकी आदळणे, पडणे, वाहनांना वाहनांचे धक्के लागणे अशा घटना घडत आहेत.‎तर खड्ड्यांमधून वाहनचालक कशीबशी वाट काढत‎आहेत. असे असूनही महापालिका पावसाळा संपण्याची‎वाट बघत आहे. कधी डांबरीकरण तर कधी व्हाइट‎टाॅपिंगचा पर्याय दिला जाताे मात्र आहे ते खड्डे साधा मुरुम‎टाकूनही बुजविला जात नसल्याचा राेष नागरिकांमध्ये‎निर्माण झाला आहे.

श्रमिकनगर येथे राहणारे राजकुमार‎सिंह हे साेमवारी (दि. २८) सकाळी कामावर जाण्यासाठी‎घरून दुचाकीवरून निघाले हाेते. सकाळी ८ वाजेच्या‎सुमारास सातपूर-अंबड लिंकराेडवर दत्त मंदिर परिसरात‎खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे वाहन घसरले.‎याचवेळी तेथून जाणाऱ्या आयशरखाली सापडून त्यांचा‎मृत्यू झाला.‎

महापालिकेच्या सातपूर विभागात कार्यरत असलेले मयूर काळे हे रविवारी रात्री त्यांच्या‎एमएच १५ जेडी ०३६६ या चारचाकी वाहनाने सिडकाेतील घराकडे जात असताना त्यांचे‎वाहन रस्ता दुभाजकाला धडकून सातपूर पाेलिस ठाण्याजवळील सर्कलला धडकले. या‎अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले,‎मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.‎
खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये चिड‎
सातपूर-अंबड लिंकरोडसह त्र्यंबकेश्वर रोडवरील‎जाधव संकुल सिग्नल येथे रस्त्यावर खड्डे पडलेले‎आहेत. पालिकेने वरवर खडी, माती टाकून‎मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र खड्डे‎बुजवल्यानंतर लगेचच त्यातील खडी, माती‎रस्त्यावर आल्याने वाहने घरसण्याचे प्रकार घडत‎आहेत. आता या खड्ड्यांनी एक बळी घेतल्यानंतर‎तरी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग यावी आणि‎त्यांनी रस्त्याचे काम करावे, अशी मागणी निवृत्ती‎आगळे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.‎

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *