5 दिवसांच्या लेकीसह आईने असे भयानक कृत्य केले की शेजाऱ्यांचा थरकाप उडाला; पोलिसही चक्रावले

Palghar Crime News : एका पाच दिवसांच्या चिमुरडीसह जन्मदात्या मातेनेच धक्कादायक कृत्य केले आहे. मातेचा हा निर्दयीपणा पाहून शेजाऱ्यांचा थरकाप उडाला. तर, तिचे हे भयानक कृत्यपाहून पोिसही हादरले आहेत. पालघरमध्ये ही खळबळजनक घटना घडलेय. चिमुरडीचा जीव घेऊन मातृत्वाला काळिमा फासणाऱ्या या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

तिसरी मुलगी झाल्याने आईनेच पाच दिवसीय चिमुकलीची हत्या केली आहे.  मातृत्वाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पालघरच्या तारापूर परिसरात उघडकीस आली आहे.  श्रेया प्रभू या 32 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केलेय. 

मुलगी झाली म्हणून जीव घेतला

तारापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या घीवली या गावात  श्रेया प्रभू राहते.  श्रेया प्रभू हिला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा झाला होता. मात्र, तिसऱ्यांदा आपल्याला मुलगाच होईल अशी अपेक्षा या निर्दयी मातेला होती. मात्र, मुलगी झाल्याने तिने अवघ्या पाच दिवसाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related News

पुरावा सापडू नये म्हणून चिमुकल्या मुलीचा मृतदेह ही नदीत फेकला

शिवाय हत्येचा पुरावा सापडू नये म्हणून या निर्दयी मातेने आपल्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह ही नदीत फेकला होता . तीन दिवसांपूर्वी जन्म घेतलेल्या बाळाच्या तपासणीसाठी आशा सेविका गेली असता आरोपी महिलेने तिला उडवाउडवी ची उत्तर दिली . मात्र,  शेजाऱ्यांकडून माहिती मिळवली असता ही महिला घराबाहेर जाताना आपल्या चिमुकल्या मुलीसह गेली. मात्र, घरी परतताना ती एकटीच परतल्याच आरोपी महिलेच्या शेजाऱ्यांकडून सांगितल्यानंतर आशा सेविकेचा संशय बळावला. यानंतर आशा सेविकेने त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.  आरोपी महिलेला तारापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

अपहरणकर्त्यांनी केली व्यावसायिकाची हत्या 

पालघरमध्ये अपहरणकर्त्यांनी हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले होते. अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहमद अलीचं अपहरण केलं. त्यानंतर हत्या करून मृतदेह जाळला. प्रशांत संखे, रामदेव संखे आणि प्रशांत महाजन ही अपहरणकर्त्यांची नावं. व्यावसायिक वादातून त्यांनी अपहरण केलं. पोलिसांनी या तिघांना वापी आणि अमळनेरमधून अटक केली. 9 मे रोजी दुपारी 2 च्या सुमाराला पालघरमधल्या जुना सातपाटी रोड इथून अपहरण केलं. या घटनेचा तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप आरिफच्या नातेवाईकांनी केलाय.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *