सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ: गर्दीच्या ठिकाणी संसर्ग वाढण्याची शक्यता; काळजी घेण्याचे आवाहन

अमरावतीएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक
  • सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये वाढली गर्दी

वातावरणासह पाण्यात झालेला बदल तसेच डोळ्यांचा संसर्ग या कारणामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये दरदिवशी दिड हजारांवर रुग्ण उपचारासाठी येत आहेत.

Related News

मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळला आहे. सद्या पावसाने उसंत घेतली आहे. मात्र सततच्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे सोबतच पाणीसुध्दा बदलेले आहे. यामुळे बदललेल्या वातावरणाचा मानवी शरीरावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील बहुतांश घरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळत आहे. इर्विनमध्ये (जिल्हा सामान्य रुग्णालय) दरदिवशी दोनशेपेक्षा अधिक रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येत आहेत. याचवेळी खासगी डॉक्टरांकडे ४०० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. तर महानगर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दरदिवशी सर्वाधिक ९०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

पावसाळ्यात व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढतात. सर्दी, खोकला ताप आदींचे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ उपचारासाठी येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. – डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय पिण्याचे पाणी फार दिवस साठवून ठेवू नये, कुलरमध्ये तसेच घराच्या आजूबाजूला पाणी साचू नये अशी व्यवस्था करावी, कुंड्यांच्या खाली असलेल्या प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका, कुलरमध्ये पाणी राहू देऊ नका,घराजवळ, परसबागेत डबके साचणार नाही, हे आवर्जून बघा, हौद, पाण्याची टाकी उघडी ठेऊ नका. ^महानगर पालिकेच्या क्षेत्रात १८ शहरी आरोग्य केन्द्र आहेत. सद्यःस्थितीत सरासरी प्रतिदिवस ९०० रुग्ण या केंद्रांमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामध्ये सर्दी, ताप, खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ दिसत आहेत. सध्यातरी डेंग्यू, मलेरिया अशा आजारांचे रुग्ण आढळले नाहीत. जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत शहरात डेंग्यूच्या २८ रुग्णांची नोंद आहे. – डॉ. विशाल काळे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, मनपा.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *