शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक: तर गर्दीत PMPL बसमध्ये महिलेची सोन्याची पाटली चोरली

पुणे2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

शेअर मार्केट करन्सी मध्ये गुंतवणूक करायला सांगून एका जेष्ठ नागरिकाची ३ लाख ७८ हजार ३६८ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी रत्नाकर बाळकृष्ण कोडिलकर (वय-७४, रा. राहुलनगर, कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फोन करून नाव सांगणाऱ्या ऋषी शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे २०२३ ते ३ जुलै २०२३ दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांना फोन करून ऋषी शर्मा बोलत असल्याचे सांगितले. शेअर मार्केट करन्सी मध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार यांच्या बँक खात्यातून ३ लाख ७८ हजार ३६८ रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करत आहेत.

PMPL बसमध्ये महिलेची सोन्याची पाटली चोरली

पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील सोन्याची ३० हजारांची सोन्याची पाटली कापून नेली. ही घटना महानगरपालिका ब्रीजजवळील बसस्थानकावर घडली. याप्रकरणी सहकारनगर परिसरात राहणार्‍या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सहकारनगर परिसरात राहायला असून कामानिमित्त शिवाजीनगर परिसरात आली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास महिला मनपा ते धनकवडी बसमध्ये प्रवेश करीत होती. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन तिच्या हातातील ३० हजारांची सोन्याची पाटली कापून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रताप साळवे पुढील तपास करीत आहेत.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *