न्यायाधीशाच्या स्वाक्षऱ्या करून महिला वकिलानेच दिला जामीन; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime News : जामीनाच्या कादपत्रांवर न्यायाधिशांच्या सह्या झाल्याशिवाय आरोपींना जामीन मिळत नाही. मात्र, एका महिला वकिलाने न्यायाधीशाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून आरोपीला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील दहिसर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या प्रकरणी आपल्या क्लाईंटसह न्यायव्यवस्थेलाच गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला वकिलाविरोधात दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

हिरल जाधव असे या महिला वकिलाचे नाव आहे. हिरल जाधव दिंडोशी सत्र न्यायालयात कार्यरत आहे. सत्यता ईश्वर नायडू (26) या महिलेने हिरल जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सत्यता यांच्या पतीला 2021 मध्ये खुनाच्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे. तेव्हापासून सत्यता यांचे पती ठाणे येथील कारागृहात कैद आहेत. पतीला जामीन मिळावा यासाठी सत्यता धावधाव करत आहे. अखेरीस हिरल जाधव या महिला वकिलाने सत्यता यांच्या पचीला जामीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले. हिरल यांनी जामीनाची प्रत सत्यता यांच्या हातात दिली. ही जामीनाची प्रत घेवून त्या ठाणे जेलमध्ये गेल्या. मात्र, ठाणे कारागृह प्रशासनाने सत्यता यांच्या पतीला जामीन देण्यास नकार दिला. यामागचे कारण समजल्यावर सत्यता यांना मोठा धक्का बसला.

महिला वकिलाने 90 हजारांचा गंडा घातला

पतीला अटक झाल्यानंतर सत्यता चिंतेत होत्या. पतीला जेलमधून बाहेर काढण्यासाठी त्या धडपडत होत्या. पतीला जामीन मिळावा यासाठी सत्यता यांनी अनेक वकिलांशी संपर्क साधला. अखेरीस हिरल जाधव या महिला वकिलाने सत्यता यांना त्यांच्या पतीला जामीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी हिरल जाधवने सत्यता यांच्याकडे 90 हजार रुपये मागितले. यातील 25 हजार ही जामीनाची अनामत रक्कम असल्याचे हिरलने सत्यता यांना सांगितले. सत्यता यांनी 90 हजार रुपये गोळा करुन हिरल जाधव या महिला वकिलाला दिले. 

Related News

अशी पकडली गेली चोरी

हिरल जाधवने 25 हजार रुपयांच्या जाम मुचलक्याची खोटी पावती तसेच न्यायाधिशांच्या खोट्या स्वाक्षऱ्या असलेला जामीन आदेश सत्यता यांना दिला. पतीला सोडवण्याकरिता सत्यता हा जमीन आदेश घेवून ठाणे कारागृहात गेल्या. मात्र, हा जामीन आदेश, 25 हजार भरल्याची पावती तसेच न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या खोट्या आहेत. यामुळे जामीन देता येणार असे ठाणे कारागृह प्रशासनाने सांगितले. हिरल जाधव या महिला वकिलाने आपली फसवणुक केल्याचे लक्षात येताच सत्यता यांना मोठा धक्का बसला.

महिला वकिला विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

सत्यता यांनी दहिसर पोलिस ठाण्यात हिरल जाधव  विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.  पोलिसांनी जाधव यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468 आणि 471 नुसार फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला आहे.  गुन्हे शाखा युनिट 12 सध्या या प्रकरणाचा तपास करत  असल्याचे दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले.  Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *