रिक्षाचालकाचा मॉलच्या शौचालयात नेऊन मुलावर लैंगिक अत्याचार; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबईतील वाशी येथे मॉलच्या शौचालयात नेऊन 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रिक्षाचालकाने मुलावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आपल्या मित्रांसह मॉलमध्ये गेला होता. यावेळी रिक्षाचालकाने त्याला तेथील शौचालयात नेलं आणि लैंगिक अत्याचार केले. 

वाशी पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक संजय नळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय आरोपी रिक्षाचालक मुलाला घेऊन मॉलच्या तळमजल्यावर गेला होता. येथे त्याने शौचालयात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही वेळाने मुलाने तेथून पळ काढला आणि आपल्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. 

मुलाच्या कुटुंबाने यानंतर तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Related News

14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवी मुंबईत एका 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत तिला गर्भवती केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कामोठेत राहत असून, मुलगी तुर्भे परिसरात वास्तव्यास आहे. जानेवारी 2021 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. 

कामोठे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या निवासस्थानी मुलीवर वारंवार बलात्कार केला. यामुळे मे 2023 मध्ये मुलगी गर्भवती झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीच्या आईला आपल्या मुलाच्या या कृत्याची सर्व माहिती होती. पण तिने विरोध केला नाही. 

मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पॉक्सो आणि इतर कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *