‘बलात्कार हे एकट्याचे काम नाही, त्यासाठी दोन-तीन…’ कर्नाटकातील राजकीय नेत्याच्या व्हायरल ऑडिओने खळबळ | महातंत्र
महातंत्र ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अमरगौडा पाटील बय्यापूर यांच्या संभाषणाचा एका व्हायरल ऑडिओमुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने बलात्कार करणे शक्य नाही असे विधान या व्हायरल व्हिडिओत केले आहे. या वादग्रस्त विधानाने सत्ताधारी पक्षात पेच निर्माण झाला आहे.

 १० ऑक्टोबर रोजी कोप्पल महिला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार अमरगौडा यांचा सहकारी संगनगौडा यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. या संदर्भात तक्रार नोंदवूनही आरोपींवर कारवाई झाली नाही. पीडितेच्या सासरच्यांनी माजी आमदारांची भेट घेऊन न्याय मिळावा यासाठी मदत देखील मागितली आहे. सध्या या प्रकरणात एका व्हायरल ऑडिओमुळे खळबळ उडाली आहे. या ऑडिओनुसार, अमरगौडा म्हणतात की, ‘ते (सासरे) एसपीकडे का गेले आणि यामुळे त्यांची प्रतिष्ठा का खराब केली.’

संभाषणाच्या ऑडिओमध्ये अमरगौडा म्हणतात की, “एकट्या व्यक्तीने बलात्कार करणे कसे शक्य आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोन व्यक्तींचा सहभाग असतो. तुम्ही एका माणसाला पाठवा, मी एका महिलेला माझ्यासोबत येण्यास सांगेन, तो तिच्यावर बलात्कार करू शकतो का ते पाहू. ही संवेदनशील बाब आहे आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, थोडासा विचार करा.” अमरगौडा यांच्या बलात्कारविषयकच्या या विधानाने आता कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानाने सत्ताधारी पक्ष आता अडचणीत सापडला आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *