IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात एबी डिव्हिलियर्सची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी

AB de Villiers Prediction On Shaheen Afridi: भारत- पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. असे असले तरी पाकिस्तानी खेळांडूच्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन पाहायला मिळाले. टिम इंडियाच्या अनुभवी बॅट्समन्सना त्यांनी एक मागोमाग एक असे पॅव्हेलियनमध्ये धाडत चांगली सुरुवात केली होती. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सने केलेली भविष्यवाणी चर्चेचा विषय बनली आहे. 2 सप्टेंबरला रात्री साडे दहाच्या सुमारास त्याने ट्विट केले. आपण बोललो तसेच झाल्याचे त्याने यात म्हटले आहे. दरम्यान त्याने ही भविष्यवाणी कोणाबद्दल केली? नेमकं काय झालंय? याबद्दल जाणून घेऊया. 

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने भारताविरुद्धच्या सामन्यात चमकदार खेळी केली.  या गोलंदाजाने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह चार भारतीय फलंदाजांना माघारी पाठवले. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरतो की काय? असे वाटू लागले. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसाने व्यत्यय आणला. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्सचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एबी डिव्हिलियर्स काय म्हणाला?

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्सने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, मी भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीतील लयबद्दल बोलत होतो. शाहीन आफ्रिदी योग्य लांबीवर चेंडू टाकू शकत नाही, असा क्रिकेट चाहत्यांना वाटत होते. पण शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीत कशाचीही कमतरता नाही, असे मी आधीच सांगितले होते. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी त्याने आपली सर्वोत्तम खेळी वाचवली आहे. ही पोस्ट लिहिताना त्याने हास्याची इमोजीदेखील टाकली आहे. 

एबी डिव्हिलियर्सचे ट्विट व्हायरल…

जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अंदाज लावला आणि ती गोष्ट नंतर खरी ठरली, तर तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल. जसा मी भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीसाठी केला होता. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबीचे ट्विट डिव्हिलियर्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

 शाहीन आफ्रिदीच्या भेदक माऱ्याला परतवणारी आणि प्रत्युत्तर देणारी सुरुवात टिम इंडियाला गरजेची होती. सुरुवात चांगली झाली असती तर विजय नक्की होता, असेही म्हटले जात आहे.

सामन्यात पावसाचा खो 

श्रीलंकेत झालेला भारत आणि पाकिस्तान खेळवला गेलेला आशिया कपमधील तिसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. पावसाने धुंवाधार बॅटिंग केल्याने सामन्यावर पाणी फेरलं गेलं. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. भारताने पाकिस्तानसमोर 267 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी सुरू होण्याआधी पावसाने एन्ट्री केली अन् सामना रद्द करण्याची वेळ आली. सामना रद्द केल्यानंतर दोन्ही संघांना 1-1 अंक देण्यात आला आहे. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *