- Marathi News
- Local
- Maharashtra
- Nagpur
- 426 Memorandum Of Understanding In “Industry Meet ! About 1 Lakh 25 Thousand Employment Generation Through The Participation Of 28 Companies In Vidarbha
नागपूर8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक असलेले कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परिसरातील गुरुनानक भवन येथे रविवारी “इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात आले होते. शासन, उद्योगसमूह आणि प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात आज ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून ४२६ सामंजस्य करार करण्यात आले. यात विदर्भातील २८ कंपन्यांचा सहभाग आहे. कराराच्या माध्यमातून सुमारे १ लाख २५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

‘इंडस्ट्री मिट’चे या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, आयुक्त डॅा. रामास्वामी एन. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, उपायुक्त (नागपूर विभाग) प्रकाश देशमाने, उपायुक्त (अमरावती विभाग) दत्तात्रय ठाकरे, सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकासाला पाठबळ देण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणांतर्गत महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विद्यापीठ पनवेलजवळ सुरू करण्यात आल्याचे सांगितले. यासोबतच मोठ्या प्रमाणात राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आधुनिकीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रोजगार मेळावे प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत आहेत. विविध उद्योगांशी संपर्क साधून ‘इंडस्ट्री मिट’च्या माध्यमातून करार करून आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून अनेक रोजगाराभिमुख उपक्रम विभागामार्फत राबविण्यात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.