पुणे6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हडपसर परिसरातील शिंदे वस्ती याठिकाणी जागेच्या मालकीवरुन झालेल्या वादातून दोन महिलांवर अत्याचार करण्यात आला असून एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल झाले आहे.
पहिल्या तक्रारीनुसार, शिंदे वस्तीत काम करणाऱ्या एका खाद्यपदार्थचे कंपनीत काम करणारे महिलेचे पती रात्र डयुटीवर गेले हाेते. त्यावेळी संबंधित कंपनीचे मालकाने महिलेला खाद्यपदार्थाची अाॅर्डर अाहे असे खाेटे सांगून तिला कारखान्यात बाेलवले. त्याठिकाणी तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास तुझा पती व मुले यांना खाेटया गुन्हयात अडकवणार असल्याचे सांगत वेळाेवेळी लैंगिक अत्याचार करण्यात अाले अाहे. याप्रकरणी सदर कंपनीचे मालकास पाेलीसांकडून अटक करण्यात अाली अाहे. तर, दुसऱ्या घटनेत खाद्यपदार्थाची अाॅर्डर घेण्याचे बहाण्याने ३० अाॅगस्ट राेजी अाेळखीतील दाेनजण सकाळी साडेपाच वाजता महिलेच्या घरात शिरले त्यानंतर त्यांनी महिलेच्या पृष्टभागावर हाताने फटके मारुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य करत,तिच्या मनाविरुध्द बळजबरीने महिलेवर अाळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी पाेलीसांनी लवकुश तिवारी (वय-३५) व किसन राकेश मिश्रा (वय-२०) या दाेन अाराेपींना अटक केली अाहे. या दाेन्ही घटनांचा वाद हा मालमत्तेच्या जागेवरुन झाला असल्याचे पाेलीसांचे प्राथमिक चाैकशीत समाेर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले की, मालमत्तेच्या वादातून सदर प्रकार घडला असला तरी ज्याप्रकारे आमच्याकडे पीडित यांची तक्रार आली आहे त्यानुसार संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पाेलीस याबाबत पुढील तपास करत आहे.
पुण्यासह राज्यात घरफोड्या करणारा आरोपी अटकेत
पुण्यासह राज्यातील विविध शहरात घरफोडी, दरोड्याचे गुन्हे करणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा यूनिट सहाच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, विमानतळ, येरवडा पोलीस ठाण्यातील ९ गुन्हे उघड झाले असून २ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनु उर्फ संजिव कपुरसिंग टाक (२८, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा यूनिट सहाचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान घरफोडीतील गुन्हेगार सोनू टाक हा मांजरी बुद्रूक स्मशानभूमी परिसरात थांबला असल्याची माहिती अंमलदार नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून टाक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शहरातील विविध भागात घरफोडी केल्याची कबूली दिली. टाक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यासह राज्यातील कराड, महाड, पाली, अंबरनाथ आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर, यूनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतीक लाहीगुडे, प्रमोद मोहीते, कानिफनाथ कारखेले यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
महिलेची ७० हजारांची सोन्याची बांगडी चोरीला
मोबाइलवर बोलत असताना हातातून खाली पडलेली ७० हजार रूपयांची सोन्याची बांगडी फुगे विक्रेत्या महिलांसह मुलांनी चोरून नेली. ही घटना डेक्कन परिसरातील प्रयाग हॉस्पीटल परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डेक्कन परिसरात आली होती. त्यावेळी फोनवर बोलत असताना तिच्या हातातून ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी खाली पडली. नेमके त्याचवेळी परिसरात आलेल्या फुगे विक्रेत्या महिलेसह मुलांनी बांगडी चोरून नेली. याप्रकरणी डेक्कन पोलीस तपास करीत आहेत.