कारवाई: बसमधून मोबाईल चोरी करणारी आंध्रची टोळी गजाआड; आरोपींकडून 2 लाख किमतींचे 12 फोन जप्त

पुणे36 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आंध्रप्रदेश, तेलंगणा येथून पुण्यात येऊन बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 12 मोबाईल हस्तगत केल्याची माहिती दिली आहे.

सतीश व्यंकटेश माधगोलू (वय-२२,रा.उपलपेटा, हैद्राबाद, तेलगंणा), जगदीश भास्करराव आवला (२२,रा.पारथीपुरम, आंध्रप्रदेश), विक्रम शिवनाथ दास (२२,रा.हैद्राबाद, तेलंगणा), गणेश कृष्णा गोड (२२,रा.बहारा, महासमुंद, छत्तीसगड) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दाखल केलेले तक्रारदार व त्यांचा चुलत भाऊ पाच ऑगस्ट रोजी घरी जाण्यासाठी अलंकार चौकाजवळील पीएमटी बसस्टॉपवरून केशवनगर येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्यांचे शर्टाचे खिशात ठेवलेला दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरुन नेला.

याबाबत बंडगार्डन पोलिस चौकशी करताना, पोलिस अंमलदार मनोज भोकरे व शिवाजी सरक यांना त्यांचे खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, पुणे एसटी स्टॅण्ड समोर मालधक्काकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या अंडाभुर्जीच्या गाडीजवळ चार जण थांबले असून ते मोबाईल फोन विक्री करण्याबाबत विचारणा करत आहे. त्यांचे जवळ चोरीचे मोबाइल फोन असल्याची माहिती मिळाल्यावर, पोलिसांचे पथक सदर ठिकाणी जाऊन त्यांनी चार आरोपींना ताब्यात घेतले.त्यांचे झडतीत 12 मोबाईल फोन मिळून आले असून त्यांनी ते पुणे शहरातून विविध ठिकाणी पीएमपीएमएल बस मधून चोरी केल्याचे सांगितले आहे. सदरची कारवाई पोलिस उपायुक्त र्स्मातना पाटील, एसीपी आर. एन. राजे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय रविंद्र गावडे, मोहन काळे, अनिल कुसाळकर, संजय वणवे, मनोज भोकरे, शिवाजी सरक व तुळशीराम घडे यांचे पथकाने केली आहे.

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतांवर गुन्हे शाखेची कारवाई

पुणे शहरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी बेकायदा पिस्तूल, शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खंडणी विरोधी पथकाने हडपसर भागात पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, चार काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

साहस विश्वास पोळ (वय 24, रा. सिद्धीविनायक अपार्टमेंट, वडकी, मूळ रा. परिंचे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना बेकायदा पिस्तुलांची विक्री, तसेच पिस्तूल बाळगणऱ्या सराइतांचा माग काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. पोळ याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे आणि सचिन अहिवळे यांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात सापळा लावून पोळला पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, प्रदीप शितोळे, विजय गुरव, संग्राम शिनगारे, इश्वर आंधळे, राहुल उत्तरकर, शंकर संपते आदींनी ही कारवाई केली.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *