हिंगोली41 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
हिंगोली येथील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार प्रकरणामध्ये आरोपींना पिस्टल पुरवणारा मध्यप्रदेशातील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून अटक केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पिस्टलचे धागेद्वारे मध्य प्रदेशात पोहोचल्याचे दिसू लागले आहे. पुणे येथे मजूर पट्ट्यामध्ये काम मागण्याच्या बहाण्याने गेलेल्या पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली
हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर ता. 1 ऑगस्ट रोजी गोळीबार झाला होता. या प्रकारात भौगोलिक शहर पोलिसठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसअधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपाधीक्षक प्रशांत देशपांडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके आरोपींच्या अटकेसाठी रवाना करण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार संभाजी लकूळे, किशोर कातकडे, नरेंद्र साळवे, शेख जावेद यांचे पथक माझे चार दिवसापासून पुणे परिसरात होते.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय इंदोरिया याला मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील सतीश कुशवाह याने पिस्टल पुरवले असून तो पुणे भागातील मजूर पट्ट्यामध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी साध्या वेशात जाऊन मजुरीचे काम मागण्याचे वाहण्याने मजूर पट्ट्यात शोध सुरू केला. यावेळी एका बांधकामाच्या ठिकाणी सतीश पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला अटक केली असून हिंगोली येथे आणले आहे.
पुणे येथील तुरुंगामध्ये सतीश व अक्षय याची भेट झाली व त्या ठिकाणी त्यांची मैत्री झाल्याचेही प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या भेटीनंतरच त्यांचा सतत संपर्क होता. त्यानंतर सतीश याने अक्षयला मध्य प्रदेशातून पिस्टल आणून दिल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.