मंगळवेढ्यात रास्ता रोको करत केला निषेध: जालन्यात आंदोकांवर लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

मंगळवेढाएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यासाठी काळा ड्रेस घालून निषेध करण्यासाठी आलो असलो तरी ज्या अधिकाऱ्याने लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला, त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर काळा ड्रेस परत घालणार तसेच त्यांची तोंड काळी केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही असे परखड मत सिद्धेश्वर आवताडे यांनी व्यक्त केले. ते सकल मराठा समाजाच्या वतीने संत दामाजी चौकात शनिवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला त्याप्रसंगी बोलत होते.

Related News

एक मराठा ,लाख मराठा ,या सरकारचं करायचं काय !खाली मुंडी वर पाय !! अशा घोषणा देत मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे जेष्ठ पदाधिकारी रामचंद्र वाकडे, मुरलीधर दत्तू ,मारुती वाकडे ,सोमनाथ आवताडे ,शशिकांत चव्हाण ,प्रा.येताळा भगत, शिवाजी वाकडे ,राजाभाऊ चेळेकर ,प्रशांत गायकवाड ,राहुल सावंजी ,चंद्रशेखर कोंडुभैरी ,विठ्ठल गायकवाड ,चंद्रकांत काकडे ,शरद हेंबाडे, सतीश दत्तू ,सचिन डोरले ,प्रकाश मुळीक ,मनोज माळी ,परमेश्वर पाटील ,शंकर गांडुळे आदीजण उपस्थित होते. यावेळी अजित जगताप, संतोष पवार, युवराज घुले माऊली कोंडुभैरी दत्तात्रय वरपे, नारायण गोवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी दत्ता भोसले ,दिगंबर यादव ,विजय दत्तू ,धन्यकुमार पाटील,सागर जाधव ,बालाजी पवार, हर्षद डोरले यांच्यासह सकल मराठा समाज व इतर बहुजन समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार मदन जाधव यांना निवेदन देण्यात आले. अजित जगताप … लाखोंचे मोर्चे निघाले, पण कधी गालबोट लागले नाही. ही घटना जाणीवपूर्वक, निषेध करतो अॅड. रवीकरण कोळेकर… मराठा समाजाचा लहान भाऊ म्हणून धनगर समाज कायम मराठा समाजाच्या पाठीशी राहील. मुस्लिम समाजाच्या वतीने अय्याज शेख यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *