पुणे19 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
विमान नगर येथील सोसायटीत सदनिका खरेदी करत करायचे असल्याचे सांगून एचडीएफसी फायनान्स कंपनीची 1 कोटी 68 लाख 75 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वप्नील सुनील सुळे (वय-40,रा. एरंडवणे) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रविणकुमार प्रतिककुमार मेमन, श्रीदेवी प्रविणकुमार मेनन (दोघेही रा. पिसोळी), संदीप सेवकराम बसतानी (रा. मुंढवा), योगेंद्र रघुनाथ खिस्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 ऑक्टोबर 2019 ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रविणकुमार मेमन आणि त्यांच्या सहकार्यांनी आपआपसात संगमत करून सदनिका खरेदी करायची आहे सांगून एचडीएफसी फायनान्स कंपनीकडे ए आर के प्रेम इन्फ्रास्ट्रक्चरचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र, डिमांड लेटर, पैसे भरल्याच्या पावत्या तसेच दुय्यम निबंधक कार्यालय हवेली यांच्या कार्यालयातील बनावट दस्त सादर करून कंपनीकडून १ कोटी ६७ लाख ७५ हजार गृहकर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कंपनीची फसवणूक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस कादबाने करत आहेत.
ऑनलाइन अडीच लाखांचा गंडा
बिबवेवाडी येथे राहणारे राजेश प्रदीप पवार (वय 33 )यांचा टूल्स व स्क्रॅब विक्रीचा नूतन इंटरप्राईजेस या नावाने व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी विकत घेतलेले टूल्स व स्क्रब मधील चांगल्या वस्तू विक्री करण्याकरता फेसबुकवर व्हाट्सअपवर फोटो टाकत असतात. त्यानुसार आरोपी संजय यादव या व्यक्तीने त्यांना फोन करून संजय इंटरप्राईजेस फर्म मधून बोलत असून, टाटा व महिंद्रा कंपनीस आमचे नवीन टूल जातात.
आम्ही सेकंड हॅन्ड टूल्सचे कामकाज करत नाही परंतु तुम्ही सेकंड हॅन्ड टूल्स घेत असाल तर आम्ही तुम्हाला देऊ असे सांगून तक्रारदार यांच्याकडून टूल्स खरेदी करता वेळोवेळी अडीच लाख रुपये ऑनलाईन घेतले. मात्र, तक्रारदार यांनी आरोपींना वारंवार फोन करून त्यांनी मागणी केलेले मटरेल व पैशांबाबत विचारणा केली असता, आरोपींनी तक्रारदार यांना पैसे व मटेरियल देण्यास असमर्थता दर्शवत फसवणूक केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस पुढील तपास करत आहे.