मुंबई6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
इंडिया आघाडीची तिसरी बैठक आज मुंबई पार पडली. याबैठकीत तीन महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. करे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी इंडियाच्या तिसऱ्या बैठकीत पारित करण्यात आलेले ठराव पत्रकार परिषदेवेळी वाचून दाखवले.,
बैठकीत काय झाले ठराव?
माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, पहिला ठराव आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार. जागा वाटपाची प्रक्रिया विविध राज्यांमध्ये तात्काळ सुरू करण्यात येणार असून लवकरच पूर्ण करण्यात येईल. दुसरा ठराव, आम्ही विविध राज्यांमध्ये जनसभांचे आयोजन करणार, ज्यामध्ये जनतेचे विविध मुद्दे उचलून धरले जातील. तिसरा ठराव, आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मीडिया स्ट्रॅटर्जी आणि कॅम्पेनमध्ये समन्वय राखणार जो ‘जुडेगा भारत जितेगा इंडिया वर आधारित असेल.
सगळ्यांना लाथ अन् मित्रांचा विकास
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली, चांगले निर्णय घेण्यात आले. काही समित्या तयार करण्यात आल्या. आम्ही सगळ्यांनी निश्चित केले आहे की येत्या काळात आम्ही हुकूमशाही विरोधात लढू, जुमलेबाजांच्या विरोधात लढू, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढू आणि एक नक्की सांगू इच्छितो की, आम्ही मित्र-परिवारवादाविरोधात नक्कीच लढणार. त्याचे कारण आहे की, मी बंगळुरात सांगितलं होते की हिंदुस्थान हा माझा परिवार आहे, आपण सारे हिंदुस्थानी आहोत. परिवारवादाची गोष्ट कराची असेल तर हिंदुस्थान परिवार सोडून निवडणूकीदरम्यान एक घोषणा ऐकली होती ‘सबका साथ सबका विकास’. पण जिंकल्यावर ज्यांनी साथ दिली त्यांना सगळ्यांना लाथ आणि मित्रांचा विकास हा मित्र परिवारवाद आता आम्ही चालू देणार नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.