Asia Cup : IND vs PAK सामन्यात भारताला आफ्रिदीमुळं मिळणार सहज विजय?

Asia Cup IND vs PAK : क्रिकेट जगतामध्ये सध्या आशिया चषकाची धूम पाहायला मिळत आहे. नुकत्याच सुरु झालेल्या या आशिया चषकामध्ये पाकिस्तानच्या संघाचं मनोधैर्य चांगलंच उंचावलं आहे. कारण, संघानं स्पर्धेची सुरुवातच दणदणीत विजयानं केली आहे. मुलतान येथे पार पडलेल्या  Asia Cup 2023 मधील सामन्यात (Pakistan) पाकिस्तानच्या संघानं नेपाळविरोधात 238 धावांनी सामना जिंकला. आता हा संघ भारतासोत दोन हात, करताना दिसणार आहे. 

स्पर्धा कोणतीही असो, (Team India) भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये होणारा सामना कायमच क्रिकेट रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. आतासुद्धा आशिया चषकामध्ये हा सामना शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी पार पडणार असून, दोन्ही संघ या हाय व्होल्टेज सामन्यासाठी तयार होत आहेत. कोणत्या खेळाडूची फटकेबाजी गाजणार, कोण सामनावीर ठरणार? हे असे प्रश्न पडत असतानाच पाकिस्तानच्या संघापुढे काही अडचणी उभ्या राहत असल्याचं दिसत आहे. 

शाहीन आफ्रिदीनं वाढवली चिंता… 

पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला सहज यश मिळालं असलं तरीही संघातील वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाच षटकांनंतरच तंबूत परतला आणि संघापुढं मोठा प्रश्न उभा राहिला. पहिल्या षटकामध्ये दोन गडी बाद करणारा शाहीन Boundry Line जवळ असताना मात्र काहीसा अडचणीत दिसला. तो वारंवार संघातील वैद्यकिय सल्लागारांशी संवाद साधत होता अखेर नवव्या षटकामध्ये त्यानं मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. 

Related News

 

आफ्रिदीला काय झालंय? 

प्राथमिक माहितीनुसार Cramps येत असल्यामुळं त्याला मैदान सोडावं लागलं. त्यातच मुलतानमध्ये तापमानही 38 अंशांवर असल्यामुळं 24 वर्षीय आफ्रिदी पुन्हा मैदानावर परतलाच नाही. दरम्यान, दुखापतीतून सावरल्यानंतर आणि एका मोठ्या विश्रांतीनंतर आफ्रिदी संघात परतला खरा पण, सध्या मात्र तो आपली लय शोधण्यासाठीच धडपड करत असल्याचं स्पष्ट होत आहे. भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनीही X च्या माध्यमातून हीच बाब अधोरेखित केल्याचं पाहायला मिळालं. 

आफ्रिदीचं संघात असणं पाकिस्तानसाठी मोठा आधार आहे, पण आता मात्र भारताविरोधातील सामन्यात दुखापतीमुळं तो पुन्हा संघर्ष करताना दिसला तर भारतापुढचं आव्हान बऱ्याच अंशी कमी होऊन संघाला सहज विजय मिळवणं शक्य होणार आहे. भारतीय संघासाठी ही जमेची बाजू ठरेल. तेव्हा आता प्रत्यक्ष सामन्यादरम्यान काय होणार हे पाहणं महत्त्वाचं. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *