घोडेस्वारीत 41 वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्ण: मुलीला जर्मनीत प्रशिक्षण देण्यासाठी वडिलांनी घर विकले, खेळाडूंची प्रेरणादायी कथा

  • Marathi News
  • Sports
  • India’s First Gold In Equestrian After 41 Years, Story Of Divyakriti, Sudipti

जयपूर, इंदूर10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • राजस्थानची दिव्यकृती, म. प्र. च्या सुदीप्तीची यशस्वी घोडदौड

हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने घोडेस्वारीत सुवर्णपदक पटकावले. भारताने तब्बल ४१ वर्षांनंतर या स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. घोडेस्वारी सांघिक स्पर्धेत सुदीप्ती हजेला, दिव्यकृती सिंग, विपुल छेडा, अनुष अग्रवाल यांनी भारतासाठी ही पदके जिंकली. शिवाय नौकानयनातही रौप्य मिळाले आहे. नाैकानयनमध्ये नेहा ठाकूर हिने ही कामगिरी केली आहे. वाचा या खेळाडूंची संघर्षकथा…

Related News

दिव्यकृती २ वर्षांपासून जर्मनीत राहते, ती रोज तीन तास सराव करायची

‘दिव्यकृती तीन वर्षे जर्मनीत राहून तयारी करत होती. यासाठी मी तीन घोडे घेतले होते. त्यासाठी घरही विकले. तयारीमुळे ती दोन वर्षे घरी आली नाही. पहाटे ४ वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा. घोड्यासोबत ताळमेळ बसण्यासाठी तिने स्वतःच दररोज त्याच्या आहार व साफसफाईची काळजी घेतली. तिने एड्रेनालाइन (घोड्याचे नाव) सोबत दिवसातील ३ तास घालवले. आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानंतर दोन घोडे निवडले. हा सामना चीनमध्ये होता हे आव्हान होते. सामन्यात एकाच घोड्याला परवानगी होती. तिने एड्रेनालाइनला निवडले. पाच दिवसांपूर्वी तो १४ तासांच्या हवाई प्रवासानंतर हांगझूला पोहोचला. सुरुवातीला अडचण आली. कारण हांगझूमध्ये उकाडा तर जर्मनीत हिवाळा होता. त्याने दोन दिवसांत स्वतःला जुळवून घेतले. दिव्यकृतीचा संघ जिंकला.’

(वडील विक्रम राठोड यांनी ईशांत वशिष्ठना सांगितल्याप्रमाणे)

सुदीप्ती १० व्या वर्षापासून घोडेस्वारी शिकते, ५० पदके

सुदीप्तीने वयाच्या १०व्या वर्षी घोडेस्वारी शिकायला सुरुवात केली. वडील मुकेश हजेला यांनी तिला एपीटीसी येथील प्रशिक्षक निहाल सिंग यांच्याकडे पाठवले. २०१३ मध्ये कोलकाताकडून कांस्यपद पटकावले. दोन वर्षे फ्रान्समध्ये राहून ती स्पर्धेची तयारी करत होती. सुदीप्तीने ५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

नेहाचे मोदींनी केले अभिनंदन…

सेलिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल पीएम मोदींनी मध्य प्रदेशातील देवासच्या नेहा ठाकूरचे अभिनंदन केले आहे. ती आयएलसीए-४ श्रेणीतील देशाची सर्वोत्तम खेळाडू आहे. तिने आतापर्यंत १८ पदके जिंकली. ती बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे. वडील मुकेश शेतकरी आहेत.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *