मुख्यमंत्रिपदावरुन मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर थेट वार, नंतर ट्वीट केलं डिलीट

Mohit Kamboj On Ajit Pawar : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (Ajit Pawar Group) मुख्यमंत्री पदावरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी कलं आहे. आज सकाळी लालबागच्या राजाच्या  (Lalbaugcha Raja) चरणी अजित पवारांच्या कार्यकर्त्यानं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत चिठ्ठी अर्पण केली. त्यानंतर हा वाद सुरू झाला.  

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज (बुधवारी) लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar), सुनील तटकरेही उपस्थित आहेत. त्यानंतर आज अजित पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. 

Related News

नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक आपल्या इच्छा, नवस राजाकडे बोलतात. असाच नवस राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी रणजीत नरोटे (Ranjeet Narote) यांनी केला. “अजित पवार (Ajit Pawar) लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे,” असा मजकूर असलेली एक चिठ्ठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली आहे.

अजित पवारांचा समर्थकांकडून वारंवार भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख 

अजित पवार हे पाच वेळा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पण, सध्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा मान मात्र अद्याप अजित पवारांच्या पदरी पडलेला नाही. अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचं स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्यातच आता अजित पवार हे शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ते मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. त्याचाच भाग म्हणून कार्यकर्ते राज्यातील अनेक भागांमध्ये अजित पवार यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स वारंवार झळकावत असतात. राजकीय वर्तुळातही अनेकदा अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. 

पाहा व्हिडीओ : Mohit Kamboj Vs Ajit Pawar:मुख्यमंत्री होण्यासाठी45 नव्हे तर 145आमदार लागतात,मोहित कंबोज यांचं ट्वीट

 

                                                                                                  

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *