World Cup Final 2023 PM Modi Visit Dressing Room: एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. या स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं अन् 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्स राखून पराभव केला. पराभवामुळे भारतीय खेळाडू फारच निराश झाले. या खेळाडूंना धीर देण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुममध्ये गेले होते.
खेळाडू रडू लागले
आपल्याला एवढी मेहनत केल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचं दु:ख भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजला मैदानातच अश्रू अनावर झाले. विराट कोहलीही मैदानातून बाहेर पडताना तोंड लपवूनच बाहेर पडला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मैदानात उपस्थित होते. भारताचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधानांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना धीर दिला. मोदींचा भारतीय ड्रेसिंग रुममधील फोटो भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पोस्ट केला आहे.
शमीने काय म्हटलं आहे
शमीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी शमीला मिठी मारताना दिसत आहेत. मोदी कौतुकाने शमीला शब्बासकी देतानाच त्याला धीर देत असल्याचं फोटोत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, “दुर्देवाने कालचा दिवस आमचा नव्हता. संपूर्ण स्पर्धेमध्ये मला आणि आपल्या संघाला पाठिंबा देणाऱ्या सर्व भारतीयांचे मी आभार मानतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानतो जे स्पेशली ड्रेसिंग रुममध्ये आले आणि त्यांनी आमचं मनोधैर्य वाढवलं. आम्ही नक्कीच पुन्हा दमदार पुनरागमन करु” असं शमीने म्हटलं आहे. मोहम्मद शमी हा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
PM Modi in Sindhudurg Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं झालं आहे. दरवर्षी ४ डिसेंबरला साजरा होणारा नौदल दिन यावर्षी जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने साजरा होत आहे. याच नौसेना दिनाच्या...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
India vs Australia 4th T20I : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Shaheed Veer Narayan Singh stadium) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
Payal Ghosh On Irfan Pathan : बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) तिच्या भन्नाट पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. वर्ल्ड कप सुरू असताना पायल घोषचं नाव अचानक चर्चेत आलं होतं. त्याला कारण मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दिलेली ऑफर... पायलने पोस्ट लिहित...
Team India Squad for South Africa tour : साऊथ अफ्रिकाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची (Team India) घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे. कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे. अशातच...
Ravichandran Ashwin Statement: भारताचा दिग्गज अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची कर्णधारपदावरुन तुलना करणारं वक्तव्य केलं आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) तीनवेळा आयसीसी ट्ऱॉफीचं जेतेपद पटकावलं आहे. धोनीच्या...
भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानेही पराभवामुळे आम्हा सर्वांची निराशा झाली असली तरी चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही पुढे वाटचाल करत राहू असं म्हटलं आहे. तसेच जडेजाने पंतप्रधान मोदींनी ड्रेसिंग रुममध्ये येऊन धीर दिल्याचं सांगत मोदींबरोबरच ड्रेसिंग रुममधील फोटोही पोस्ट केला आहे.
We had a great tournament but we ended up short yesterday. We are all heartbroken but the support of our people is keeping us going. PM @narendramodi’s visit to the dressing room yesterday was special and very motivating. pic.twitter.com/q0la2X5wfU
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य वाटलं. भारताने नेहमीप्रमाणे या सामन्यालाही दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने त्याच्या आक्रमक शैलीमध्ये फटकेबाजी केली. मात्र शुभमन गिल स्वस्तात परतल्यानंतर रोहित शर्माही अर्धशतकापासून 3 धावा दूर राहिला. रोहित बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अहमदाबादच्या वापरलेल्या खेळपट्टीचा पूर्ण वापर केला. विराट कोहली आणि के. एल. राहुल या दोघांनाही अर्धशथकं झळकावली. मात्र त्यांनी फारच संथ खेळ केल्याची टीका सोशल मीडियावरुन होताना दिसतेय. सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात विशेष चमक दाखवता आली नाही. तळाचे फलंदाज कुलदीप यादव आणि सिराज यांनी तळाशी फलंदाजी करताना काही फटकेबाजी केल्याने भारताचा स्कोअर 240 पर्यंत पोहोचला.
…अन् ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला
भारतीय गोलंदाजांनी उत्तम सुरुवात केली. 47 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 3 गडी तंबूत परतले होते. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबूशेनने 192 धावांची पार्टनरशीप केली. हेडने शतक झळकावत वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा 7 वा खेळाडू होण्याचा मान मिळवला. भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघ 6 व्यांदा विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, अॅशेज आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे.