जालना येथील घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी, राजकीय वातावरण तापले

Jalna Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. तर या सर्व घटनेला सरकार जबाबदार असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. हे गृहविभागाचे अपयश असून, फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे. 

जालना येथे अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करीत गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. 

Related News

मराठा आरक्षण देण्याबाबत भाजपने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना, अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात आहे. मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी आम्ही करत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

गृहविभागाचे अपयश 

जालना येथे झालेल्या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्यात यावी, यातील सर्व दोषींवर कारवाई करावी. या प्रकरणात सर्व गृहविभागाचे अपयश असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

गृह विभागाच्या आदेशाशिवाय लाठीमार होत नसतो : रोहित पवार 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जालन्यातील 8 तारखेच्या नियोजित कार्यक्रमाला अडचण येईल म्हणून हे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान गृह विभागाच्या आदेशाशिवाय हा लाठीमार होत नसतो म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. रोहित पवार यांनी पहाटे अडीच वाजता समन्वयक मनोज जरांगे यांच्या कुटुंबाशी संवाद साधून विचारपूस केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा देखील केली.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jalna Protest : जालन्यातील घटनेचे औरंगाबाद जिल्ह्यात पडसाद, आज ठिकठिकाणी आंदोलनं आणि बंदची हाक

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *