जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेनंतर 19 बसेसची जाळपोळ: अनेक ठिकाणी एसटी सेवा ठप्प, राज्यभरातील लाखो प्रवाशांचे हाल

मुंबई32 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले. राज्यभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन सकल मराठा समाजाने या घटनेचा तीव्र निषेध केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर त्याच रात्री व शनिवारी अनेक ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. संतप्त मराठा तरुणांनी काही ठिकाणी एसटी बससेची जाळपोळ व तोडफोड केल्याचेही समोर आले आहे. राज्यात एकूण 19 एसटी बसेसचे यामुळे नुकसान झाल्याचे आता समोर येत आहे.

Related News

खासगी वाहनचालकांकडून दुप्पट भाडेवसुली

संतप्त मराठा समाज रस्त्यावर उतरल्याने खबरदारी म्हणून अनेक आगारांमधील एसटींची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी एसटी सेवा ठप्प झाल्या आहेत. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटीची बससेवा बंद असल्याने खासगी प्रवासी वाहनधारकांनी दीडपट ते दुप्पट भाडेवाढ केल्याचेही समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून जालना येथे जाण्यासाठी ऐरवी खासगी वाहनचालक 80 रुपये भाडे आकारतात. मात्र, शनिवारी त्यांनी 150 रुपये भाडे आकारले. तर छत्रपती संभाजीनगरहून चिखली येथे जाण्यासाठी 200 ऐवजी 300 ते 350 रुपये भाडे मोजावे लागले. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनामुळे शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील सहा आगारांतील 490 बस धावल्या नाहीत. यामुळे 90 हजारांहून अधिक प्रवाशांची गैरसोय झाली.

नागपूरहून निघालेले प्रवासी अडकले

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याची सर्वात जास्त झळ मराठवाड्याला बसल्याचे समोर येत आहे. शनिवारी नागपूरहून एसटीने छत्रपती संभाजीनगरला निघालेले बरेच प्रवासी मध्येच अडकून पडल्याचे समोर आले आहे.नागपूरहून छत्रपती संभाजीनगर येथे निघालेली बस वाशिमला पोहचल्यावर रद्द झाली. अंबेजोगाईला निघालेली बस पुसदला रद्द झाली. छत्रपती संभाजीनगरला निघालेली एक बस कारंजा लाड येथे तर दुसरी बस चिखली येथे रद्द झाली. त्यामुळे नागपूरहून मराठवाड्याच्या दिशेला निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप झाला. मराठा आंदोलनामुळे शनिवारी नागपूरहून छत्रपती संभाजीनगर, अंबेजोगाई, सोलापूर, पुणेपर्यंत जाणाऱ्या बससेवेला फटका बसला. मराठवाड्यात आंदोलन पेटल्याने तेथील पाचपैकी एकही बस नागपुरात परत आली नाही.

भरधाव कार दुभाजकावर आदळली, पती-पत्नी जागीच ठार:कळमनुरीजवळ सकाळीच भीषण अपघात, मुलगा गंभीर जखमी

हेही वाचा,

जालन्यातील आंतरवाली सराटी ग्रामस्थांची आपबीती:“पोलिस माघारी जाणार, तुम्ही आंदोलन सुरू ठेवा’’ म्हणत बेसावध करून मारहाण

आंतरवाली गावात शुक्रवारी दुपारी २५० पोलिस आंदोलनस्थळी आले. त्यांनी सोबत आणलेल्या डॉक्टरांकडून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची रक्त तपासणी केली. आमचे काम संपले आहे, आता आम्ही माघारी जातो, असे म्हणत उपस्थितांना बेसावध केले. नंतर अवघ्या पाच मिनिटांनी पोलिसांनी साखळी केली. विनवणी करणाऱ्या स्वयंसेवकांना चिमटे तसेच पोटात बुक्के मारायला सुरुवात केली. गर्दी करून धक्काबुक्की करत पोलिसांनी थेट लाठीमार सुरू केला. महिलांनाही मारहाण केली. यामुळे चिडलेल्या आंदोलनकर्त्यांनी प्रतिकार करण्यासाठी दगडफेक केली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. वाचा सविस्तर

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *