पक्षफुटीनंतर शरद पवारांची जळगावमध्ये पहिलीच जाहीर सभा; रोहित पवार दोन दिवसांपासून तळ ठोकून 

जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असून शहरातील सागर पार्क येथे जाहीर सभा होत आहे. नुकतेच ते जळगाव शहरात दाखल झाले असून कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तळ ठोकून असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावची सभा महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शरद पवार नेमकं काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची जळगाव शहरातील सागर पार्कवर जाहीर सभा होत आहे. दुपारी दीड वाजता सभेची वेळ असून, त्यापूर्वी ते महापौर जयश्री महाजन (Jayashree Mahajan) यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होणार आहे. या सभेकडे आगामी निवडणुकांच्या (Election) दृष्टीने पाहिले जात आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा राष्ट्रवादीकडून राज्यातील आतापर्यंतच्या सर्व सभांपेक्षा जळगावची सभा सर्वात मोठी ठरावी, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

Related News

जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर, सभेच्या आजूबाजूला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या ध्वजाने परिसर व्यापून टाकला आहे. दरम्यान, सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर म्हणाले की, जळगावची सभा भव्य होणार असून यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आहेत, जवळपास 30 ते 35 हजार जण बसू शकतील, एवढ्या क्षमतेचा मोठा डोम उभारला आहे. यात एलईडी बॅकड्रॉप, स्क्रीन लावले आहेत, हळूहळू नागरिकांची गर्दीही जमू लागली आहे. कार्यकर्त्यांची व्यवस्था मतदारसंघनिहाय करण्यात आली आहे. पार्किंगची व्यवस्था छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाच्या मागील मैदान, लॉ कॉलेज मैदान, ए. टी. आंबरे शाळेचे मैदान आणि महेश प्रगतीच्या शेजारचे मैदानावर आहे. खासदार शरद पवार यांचं स्वागत करण्यासाठी आकाशवाणी चौकात फुलांचा 600  किलोंचा हार क्रेनने उभा केला जाणार आहे, थोड्याच वेळात शरद पवार अजिंठा चौकातून आकाशवाणी चौकात दाखल होतील. 

रोहित पवार दोन दिवसांपासून तळ ठोकून

दरम्यान काही दिवसांपासून शरद पवार यांचा जळगाव दौरा नियोजित होता. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे मागील दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तळ ठोकून होते. रोहित पवार हे दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात असून विविध भागांत दौरे, जनतेशी संवाद आणि सभा घेत आहेत. वातावरण निर्मितीसाठी पक्षाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. पक्षाचे एकमेव आमदार अनिल पाटील हे पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्या गटात गेले, मात्र बाकीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी खासदार शरद पवार यांच्यासोबत राहिले. आगामी निवडणुकांच्या मोर्चे बांधणीसाठी आजच्या सभेत जिल्ह्यातून कोणाकोणाचे प्रवेश होतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

असा आहे शरद पवार यांचा दौरा

खासदार शरद पवार यांचा मिनिट टू मिनिट दौरा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ते मुंबईहून सकाळी 9.50 वाजता जळगाव विमानतळावर येतील. तेथून 10 वाजता जळगाव शहरात येण्यासाठी निघतील. सव्वा दहा ते साडे दहा दरम्यान मेहरूण येथे महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यापुढील वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी दीड ते साडेचार वाजेपर्यंत खासदार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्कवर सभा होईल. सभा संपल्यानंतर पाच वाजता जळगाव विमानतळावरून मुंबईसाठी रवाना होतील.

इतर महत्वाच्या बातम्या :

Jalgaon News : शरद पवार यांचं प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकणं मोठी चूक, आमदार रोहित पवार यांचा हल्लाबोल 

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *