अहमदनगर : मराठा आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील ३४ गावांत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी | महातंत्र

जामखेड, महातंत्र वृत्तसेवा ; दिवसेंदिवस मराठा आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. जामखेड तहसील कार्यलयाच्या आवारात मराठा समाजाच्या वतीने साखळी पद्धतीने आंदोलन सुरू असतानाच तालुक्यातील अनेक गावांत आता राजकीय नेत्यांना आता नोएंट्री चा बॅनर झळकले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्वच गावात येत्या काही दिवसात नोएंट्री करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणामुळे आरणगाव कडकडीत बंद होते.

मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खासदार, आमदारसह, राजकीय पुढाऱ्यांना जामखेड तालुक्यातील जामखेड शहर सह खर्डा, अरणगाव यासह ३४ गावात गावबंदी करण्यात आली असून ठिकठिकाणी तसे फलक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लावण्यात आले आहेत.

येत्या दोन दिवसांत संपूर्ण जामखेड तालुक्यात राजकीय नेत्यांना गावबंधी होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा तर नाहीच, उलट त्यांच्या विरोधात चुकीचे विधान केले जात आहे. त्यामुळे गावातील सर्व समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून कोणत्याच नेत्याला आम्ही गावात येऊ देणार नाही, असा एकमुखी निर्णय मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत विविध पद्धतीने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विविध पद्धतीने पाठिंबा

तालुक्यातील विविध गावात विविध प्रकारचे आंदोलने करताना दिसत आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तालुक्यातून मोठया प्रमाणात समर्थन मिळत आहे. मराठा आरक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील विविध गावात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करताना दिसत आहे.मराठा आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

तालुक्यातील या गावांची नेत्यांना नोएंट्री

जामखेड तालुक्यातील जामखेड शहर, खर्डा, अरणगाव, रत्नापुर, पाटोदा, धोत्री, जामदारवाडी, पाडळी कुसडगाव, भोगलवाडी, घोडेगाव, पिंपळगाव उंडा, पिंपळगाव आळवा, नान्नज, बोरला, सोनेगाव, सातेफळ, मुंगेवाडी, दौंडवाडी, वंजारवाडी, आपटी, तरडगाव, पोतेवाडी, जातेगाव, नायगाव, नाहुली, चोभेवाडी, तेलंगशी, भुतवडा, खुरदैठण, धनेगांव, वाकी, लोणी या गावात गावबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिली आहे.

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *