खेळाडूंच्या सरावापासून ते प्रशिक्षणापर्यंत AI मुळे सर्वकाही बदलले: प्रत्येक खेळाडूसाठी वैयक्तिक प्लॅन, समालोचन-निर्णयांमध्येही उपयुक्त

नवी दिल्ली4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नॅशनल फुटबॉल लीग ही क्रीडा आधारित चित्रपटांचे विश्लेषण व खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी, तसेच मेजर बेसबॉल लीग संघांना खेळाडूंबाबत चांगले निर्णय घेण्यासाठी एआयची मदत घेत आहे. एआयमुळे क्रीडा प्रशिक्षण, स्काउटिंग, रेफरीशिप, सामन्याचा अंदाज लावणे, समालोचन करणे सोपे झाले आहे. २०३० पर्यंत क्रीडा क्षेत्रात एआय विभाग १.६ लाख कोटी रुपयांचा होईल. देशातही याची मदत घेतली जातेय. जाणून घेऊया एआय क्रीडा जगताला कसे बदलत आहे…

Related News

गोल्फ बॉलची अचूक माहिती देत आहे मॉनिटर
पोर्टेबल लाँच मॉनिटर गोल्फ कोर्सचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. गोल्फर सराव करताना किंवा स्पर्धेपूर्वी हे मॉनिटर शॉट लावण्याऐवजी ज‌वळ ठेवतात. यांच्या मदतीने अँगल, बॉलचा स्पिन रेट, शॉट मारल्यास तो किती दूर जाईल आणि त्याच्या स्विंगची अचूक माहिती मिळते. यांचे विश्लेषण करून गोल्फर आपली कामगिरी सुधारतो.

हालचालींची रेकॉर्डिंग व ट्रॅकिंग करताहेत उपकरणे
एआय बेस्ड विअरेबल उपकरणाचे अनेक पर्याय आहेत. त्यात व्यावसायिक, हौशी आदी सर्व खेळाडूंना रस आहे. यात स्मार्ट ब्रेसलेट, कनेक्टेड स्निकर्स, स्मार्ट क्लॉथ, हार्ट रेट मॉनिटर खूप लोकप्रिय आहेत. ते खेळाडूंच्या हालचाली ट्रॅक करण्यासह त्यांचा व्यायाम, सराव व खेळाच्या डेटाचा रेकॉर्ड ठेवतात. जेणेकरून तो पाहून कामगिरीत सुधारणा करता येईल.

सायन्स फिक्शनप्रमाणे दिसतील क्रीडा स्पर्धा
चाहते टीव्हीप्रमाणेच मैदानात बसून एआयद्वारे सामन्याच्या रिअल-टाइम विश्लेषणाचा आनंद घेतात. व्हर्च्युल रिप्लेही मिळतात. तिकिटे, गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षेसाठीही याची मदत होते. मैदानात स्वच्छता, देखभालीसाठी ड्रोन व रोबोट डिझाइन होताहेत. याद्वारे क्रीडा स्पर्धा सायन्स फिक्शनप्रमाणे दिसतील.

एआय लाइन जजऐवजी व्हिडिओद्वारे करेल रिव्ह्यू
यंदा यूएस ओपनमध्ये एआय जनरेटेड समालोचनासह व्हिडिओ रिव्ह्यू तंत्रज्ञानही असेल. लाइन जजप्रमाणे एआय काम करेल. आव्हान दिल्यास व्हिडिअोद्वारे निर्णय घेईल. एखाद्या ग्रँड स्लॅममध्ये असे प्रथमच होईल. फुटबॉलमध्ये व्हीएआर आणि क्रिकेटमध्ये डीआरएसचा वापर केला जातो.

डेटा डॅशबोर्डमध्ये ठेवून होत आहे खेळाडूंची पारख
फुटबॉलचे अनेक प्रमुख क्लब आता ट्रान्सफर मार्केट आणखी स्पर्धात्मक बनवण्यासाठी एआयचा वापर करत आहेत. खेळाडूंची पारख करण्यासाठी स्काउटिंगची जुनी पद्धत संपुष्टात येत आहे. आता त्यांचा डेटा डॅशबोर्डमध्ये ठेवून विश्लेषण केले जाते. याच्या मदतीने कोच खेळाडूंची खरेदी करतात.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *