मराठा आंदोलकांवर लाठीमार, दोषींवर कठोर कारवाई करणार: आपण मराठा आंदोलकांसोबत, अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalana Lathi On Maratha Protesters, Strict Action Will Be Taken Against The Culprits Ajit Pawar On Jalana Lathi Charge Maratha Protesters Maratha Reservation

मुंबई37 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

“मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजित पवार म्हणाले की, राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. असा विश्वास देतो.

अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.” अशी स्पष्ट भूमिका मांडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यात परिस्थिती बिघडणार नाही

राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना केले आहे.

या संबंधी आणखी बातम्या वाचा…

शिंदेंनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा:पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी; म्हणाले, ‘मुंबईतून आदेश आल्यानेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न’

जालना जिल्ह्यातील सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्रही लिहिले आहे. पूर्ण बातमी वाचा…

आरक्षणाची सरकारची माणसिकता नाही:लाठीचार्ज हे गृहविभागचे अपयश, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; वडेट्टीवारांची मागणी

संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि हे सर्व गृहविभागाचे अपयश आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात टीका केली. पूर्ण बातमी वाचा…

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *