मुंबई30 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवार यांना लांडगा म्हणत असेल, तर ते काय आहेत, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. अशा लोकांना चिरडण्याची भूमिका ते घेतील. तेव्हा अजित पवार वाघ, सिंह आणि हत्ती आहेत, हे दाखवून देतील, असे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरात बोलताना मांडली.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत’, अजित पवारांना आम्ही मानत नाही, असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर अजित पवारांच्या गटाकडून टीकास्र सोडण्यात येत आहे. राज्यात पडळकरांविरोधात आंदोलनही करण्यात आली आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पडळकरांचं वक्तव्य अयोग्य
पडळकरांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकराची विधान करणं चुकीची आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. याप्रकारच्या भाषेचा वापर करू नये, असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?
धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे, असे गोपीचंद पडळकर यानी म्हटलं होतं.
महाराष्ट्राच्या राजकारणातील अन्य बातम्या ही वाचा
मी अजित पवारांना मानतच नाही, तर सिरीयस घेण्याचा प्रश्नच नाही:गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल; म्हणाले – मी माझ्या प्रश्नांवर ठाम

मी अजित पवार यांना मानतच नाही. त्यामुळे त्यांना सिरीयस घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा तिखट शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी भाजप व अजित पवार गटात बेबनाव निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. – क्लिक करा, वाचा संपूर्ण बातमी
‘हे म्हणजे शिळ्या कडीला उत!:चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाल्या- आठवणीने उमाळा दाटून येणारी की सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती खरी

पंतप्रधान नरेद्र मोदींकडून काँग्रेस व राष्ट्रवादीवर भ्रष्टाचार व घराणेशाहीचा आरोप करण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी काल संसदेतील विशेष अधिवेशनात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जर भ्रष्टाचार केला असेल, तर सखोल चौकशी करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी एकप्रकारे अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन, आता अजित पवार गटाकडून ही पलटवार केला जात आहे. – क्लिक करा, वाचा संपूर्ण बातमी