कपिल सिब्बल यांची अचानक इंडियाच्या बैठकीला हजेरी: काँग्रेस नेत्यांची जाहीर नाराजी; अखिलेश यादव, फारुख अब्दुल्लांनी घातली समजूत

मुंबई41 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. भाजप विरोधी पक्षांचे देशभरातील दिग्गज नेते बैठकीला हजर आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी आघाडीचे नेते आपली एकजूट येथे दाखवत असतानाच काँग्रेस नेत्यांमध्ये मात्र बैठकीपूर्वीच चांगलीच नाराजी पसरली. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या एका दिग्गज नेत्याने अचानक आज बैठकीसाठी ग्रँड ह्यातमध्ये हजेरी लावताच काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले. काँग्रेसच्या त्या माजी दिग्गज नेत्याचे नाव आहे कपिल सिब्बल.

Related News

के. सी. वेणुगोपाल संतापले

कपिल सिब्बल यांनी मे 2022 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचा राजीनामा देताना त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावरही टीका केली होती. यापूर्वीच्या इंडिया आघाडीच्या दोन बैठकांत कपिल सिब्बल यांनी हजेरी लावली नव्हती. मात्र, आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे फोटोसेशन होण्यापूर्वीच कपिल सिब्बल बैठकीसाठी ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये दाखल झाले. हे पाहताच काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी तर ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली.

उद्धव ठाकरेंकडे जाहीर केली नाराजी

फोटोसेशनपूर्वीच काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी थेट उद्धव ठाकरे यांना गाठत कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मुंबई प्रदेश काँग्रेस या बैठकीचे आयोजक आहेत. दरम्यान, कपिल सिब्बल यांना बोलावले कुणी? हादेखील एक नवाच प्रश्न निर्माण झाला. हे कळताच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव व फारुख अब्दुल्ला यांनी के. सी. वेणुगोपाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींमुळे प्रकरण निवळले

कपिल सिब्बल यांचे हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर राहुल गांधी यांनाही याबाबत कळवण्यात आले. मात्र, राहुल गांधई यांनी मला कोणावरही आक्षेप नाही, असे सांगितले. त्यानंतर अखेर कपिल सिब्बल यांनाही फोटो सेशनचा भाग करण्यात आले. त्यानंतर झालेल्या बैठकीतही त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांची खुर्ची ही काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांच्या बाजुलाच लावण्यात आली. त्यामुळे बैठकीत के. सी. वेणुगोपाल हे चांगलेच अस्वस्थ दिसत होते.

सिब्बल सपाकडून राज्यसभेवर

कपिल सिब्बल यांनी मे 2022 मध्ये काँग्रेस सोडली आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यापूर्वी कपिल सिब्बल हे काँग्रेसचे बडे नेते मानले जात होते. यूपीए सरकारच्या काळात कपिल सिब्बल हे केंद्रीय कायदा मंत्री आणि मानव संसाधन विकास मंत्री राहिले आहेत. पण ते काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते. त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडल्याचे बोलले जात आहे. समाजवादी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर सिब्बल म्हणाले होते की, मी काँग्रेसचा नेता होतो, पण आता नाही.

संबंधित वृत्त

‘इंडिया’च्या बैठकीचा आज दुसरा दिवस:संयोजकाची होऊ शकते घोषणा; जागावाटपासाठी प्रादेशिक समितीवर विचार

आज 1 सप्टेंबर रोजी मुंबईत इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट आघाडीच्या (I.N.D.I.A.) तिसऱ्या बैठकीचा दुसरा दिवस आहे. हॉटेल ग्रँड हयात येथे सकाळी 10 वाजता बैठक सुरू होईल. इंडिया आघाडीकडून आज दुपारपर्यंत संयोजकाचे नाव जाहीर करू शकते. तसेच, इंडिया आघाडीचा लोगो काय असावा?, यावरही विचारमंथन होणार आहे. वाचा सविस्तर

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *