RSSची अखिल भारतीय समन्वयक बैठक यंदा पुण्यात!: 14 ते 17 सप्टेंबर या काळात आयोजन; संघप्रणित 36 संघटनांचा असेल समावेश

पुणे17 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी आयोजित केली जाणारी अखिल भारतीय समन्वयक बैठकीचे यंदा पुणे शहरात आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय समन्वयक बैठक 14-15-16 सप्टेंबर 2023 रोजी होईल. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह पाचही सहकार्यवाह व संघाचे अन्य प्रमुख उपस्थित राहतील. अशी माहितीसंघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

संघप्रणित 36 संघटना होतील सहभागी
या बैठकीत 36 संघप्रणित विविध संघटनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये प्रमुख संघटना राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहतील. गेल्यावर्षी ही बैठक रायपूर येथे झाली होती.

विविध विषयावर होईल चर्चा अन् चिंतन
या सभेत सहभागी होणाऱ्या सर्व संघटना समाजजीवनातील विविध पैलूंबाबत त्यांचे अनुभव व कार्य याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीसोबतच सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक प्रबोधन, सेवा कार्य, सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा या विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार आहे. सामाजिक बदलाच्या विविध क्षेत्रातील कारक कृतींवरही चर्चा केली जाईल.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *