अंबादास दानवेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल: म्हणाले- बांगरांनी आपले जुने धंदे आठवावे, ते का तडीपार होते? त्यांना कोणी वाचवले?

हिंगोली41 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

हिंगोली येथे आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. यावरून हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. कोणात किती ताकद आहे, हे आता कळेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे संतोष बांगर म्हणाले आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतोष बांगरांवर सडकून टीका केली आहे.

Related News

...तर ही नमक हरामी

अंबादास दानवे म्हणाले, संतोष बांगर हे गद्दार आहेत. संतोष बांगर यांनी जुना काळ आठवावा ते काय धंदे करायचे ते. ते का तडीपार होते? त्यांना कोणी वाचवले आहे. त्यांनी आधी आपल्या मागच्या इतिहासात गेले पाहिजे. मगच बोलले पाहिजे. संतोष बांगर मागील सगळे आठवून ते बोलत नसतील तर ही नमक हरामी आहे.

गद्दारांना धडा शिकवला जाईल

अंबादास दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे यांची हिंगोलीमधील सभा ऐतिहासिक होईल यात शंका नाही. उध्दव ठाकरे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी देशाचे लक्ष लागले असतं. कोणत्याही व्यक्ती विरोधात ही सभा होणार नाही. ज्यांनी गद्दारी केली. त्या लोकांना जनता धडा शिकवला जाईल.

राज्यात रावणरूपी सरकार

अंबादास दानवे म्हणाले, राज्यात सध्या रावनरूपी सरकार आहे. त्यांचे वेगवेगळ्या दिशेला दहा तोंडे आहेत. त्यांची वेगळी रूपे आहेत. या रावणाचे दहन उद्धव ठाकरे आपल्या विचाराने करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्री शासन आपल्यादारी म्हणतात मात्र कधी यांचे शासन शेतात राहते तर कधी दिल्लीला राहते. कधी स्वतःला ते कोंडून घेतात. त्यांच्या शासनाने कोणते दिवे लावले, हे सांगावे.

अजित पवारांवरही टीका

अंबादास दानवे म्हणाले, ठाणे- मुंबईच्या बाहेर मुख्यमंत्री जात नाही. शरद पवार यांना उत्तर देण्यासाठी अजित पवार बीडला जात आहेत. पण योग्य उद्देश कुणाचा आहे हे जनतेला माहीत आहे. जनता गद्दारी करणाऱ्यांना साथ देणार नाही. जनता त्यांना धडा शिकवेल.

संबंधित वृत्त

आज हिंगोलीत उद्धव ठाकरेंची निर्धार सभा:गड पुन्हा उभारू- ठाकरेंची साद; कोणाची किती ताकद कळेल, संतोष बांगरांचे प्रत्युत्तर

आज हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा होणार आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. हिंगोली हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हिंगोलीचे आमदार संतोष बांगरदेखील शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे आज संतोष बांगर यांच्याविरोधात आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *