दै. महातंत्र आयोजित : महिलांच्या ‘राईझ अप’ क्रीडा स्पर्धेत कॅरमला उत्सफुर्त प्रतिसाद | महातंत्र

पुणे; महातंत्र वृत्तसेवा : दै. ‘महातंत्र’च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवुन देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा स्तरावरील ‘राईझ अप’ पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या हंगामाला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर दुसर्‍या हंगामातील कॅरम क्रीडा प्रकाराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दै. ‘महातंत्र’च्या वतीने पुण्यातील वाढत्या क्रीडा संस्कृतीमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातील महिला खेळाडूंचा सहभाग वाढावा या उद्देशाने महिलांसाठीच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये फुटबॉल, कबड्डी, बुध्दिबळ, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स, कॅरम, टेबल टेनिस, कुस्ती आणि जलतरण या खेळांचा समावेश आहे. दै. ‘महातंत्र’च्या वतीने आयोजित ‘राईझ अप’ महिलांच्या क्रीडा स्पर्धांच्या दुसर्‍या हंगामाची सुरुवात शनिवार दिनांक २ सप्टेंबर २३ पासून बुध्दिबळ खेळाने होणार आहे.

रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंचच्या प्रशस्त हॉलमध्ये कॅरम स्पर्धा होणार आहेत. कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने होणार्‍या या स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंबरोबर येणार्‍या पालकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना या स्पर्धेसाठी घेऊन यावे, असे आवाहन दै. ‘महातंत्र’ च्या वतीने करण्यात आले आहे.

या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारे दै. ‘महातंत्र’ हा एकमेव माध्यम समुह आहे. या स्पर्धेमध्ये पुष्करणी भट्टड, मेधा मठकरी, श्रृती वेलेकर, ज्ञानेश्वरी इंगुळकर, प्राची जोशी-पानसे, शुभम अफला आणि तुलिका चौरासिया या राष्ट्रीय नामांकित खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. ही स्पर्धा खुल्या गटामध्ये होणार आतापर्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक म्हणून रुपमंत्रा, मिडीया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सुर्यदत्ता इन्स्टिटयुट आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

हेही वाचा

Pune News : साऊथ कोरियासाठी पुण्यातील मुलींनी गाठली थेट मुंबई

Treatment of stomach worms : पोटातील जंतावर हे आहेत सोपे घरगुती उपचार

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या हरित प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *