मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा दिवस! जरांगेंच्या उपोषणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Aarakshan) आज अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर 10 वाजता महत्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) उपस्थितीत ही बैठक होतेय. या बैठकीला शिंदे समितीचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत. जालन्यात मनोज जरांगे पाटलांच्या (manoj jarange patil) सुरू असलेल्या उपोषणाबद्दलही मोठी घोषणा बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर यासंदर्भात दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. 

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीने आतापर्यत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे. यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची सरकारशी चर्चेची तयारी

Related News

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चेसाठी येणार असतील तर मराठा समाज त्यांची अडवणूक करणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारनं चर्चेसाठी यावं, लवकर यावं पण एकदाच तोडगा काढावा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्य सरकारनं सोमवारी घेण्यात येत असलेली उपसमितीची बैठक रद्द करुन एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं आणि कायदा मंजूर करुन आरक्षण द्यावं, असं म्हटलं आहे.

दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पहिला राजीनामा दिलाय.शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याची दखल घेत त्यांना भेटीसाठी बोलावलं आहे. हेमंत पाटील आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेटीसाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हेमंत पाटील यांनी रविवारी लोकसभा अध्यक्षांच्या नावानं राजीनाम्यांचं पत्र दिलंय. मराठा आंदोलकांनी हेमंत पाटलांची भेट घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा लिहून दिला.

आमदार अतुल बेनकेही राजीनाम्याच्या तयारीत

मराठा आरक्षणाच्या मागणीला आता राजकीय धार आलीय. जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनीही मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. मराठा आरक्षणाच्या लढ्यात ते उतरलेत. आपण लवकरच मराठा संघटनांशी चर्चा करून राजीनाम्याचा निर्णय घेणार असल्याचं आमदार बेनकेंनी सांगितलं.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *