…अन् जितेंद्र आव्हाडांनी फडणवीसांचे पाय धरले होते; हसन मुश्रीफांनी केला गौप्यस्फोट

बीड : शरद पवारांनी (Sharad Pawar) बीड जिल्ह्यात सभा घेतल्यावर आता आज अजित पवारांची देखील बीड जिल्ह्यात सभा होत आहे. दरम्यान यावेळी सभेत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अनेक मंत्री देखील उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मोठ वक्तव्य करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. “जितेंद्र आव्हाड हा भेकड माणूस आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडला होता आणि निवडणूक न लढण्याबाबत बोलला होता. एक गुन्हा दाखल झाला त्यामुळे असं वागला होता”, असे मुश्रीफ म्हणाले आहेत. 

यावेळी बोलतांना मुश्रीफ म्हणत आहे की, जयंत पाटील यांनी मला एक थक्क करणारे वक्तव्य सांगितले होते. एकदा ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते. दरम्यान यावेळी जयंत पाटील आणि अजित दादांना घेऊन आव्हाड अध्यक्षांच्या दालनात गेले होते. यावेळी तिथे तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी फडणवीस यांचे पाया पडले आणि सांगितले की विधानसभा निवडणूक लढवणार नाही. असा भेकड माणूस शरद पवारांच्या समोर वक्तव्य करतो आणि ते ऐकतात याचे आश्चर्य वाटते, असे हसन मुश्रीफ म्हणाले. 

Related News

आव्हाडांनी चुकीचं वक्तव्य केलं…

काल कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत जे भाषण केले त्यामुळे याचं खेद व्यक्त करतो. अजित पवारांनी आधीच स्पष्ट केले होते की, कोणावरही टीका करायची नाही. असे असतांना आव्हाड यांनी आमच्यावर गद्दार, गद्दारांचे रक्त, हे कसे बिळातून बाहेर आले आहेत अशी भाषा केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे माझा राग अनावर झाला होता आणि मी कोल्हापूर पायतान प्रसिद्ध असल्याचं म्हटलो, असल्याचे सुद्धा मुश्रीफ म्हणाले. 

राज्याच्या विकासासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला… 

अजित दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईत आमचा मेळावा झाला. त्यामध्ये अजित पवारांनी आमची भूमिका स्पष्ट केली होती. 2014 काय घटना घडली, 2017, 2019 आणि 2022 ला कोणत्या कोणत्या घटना घडल्या, तसेच कशासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला याची त्यांनी माहिती दिली. राज्याच्या, देशाच्या विकासासाठी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विस्ताराचे हित पाहता आम्ही निर्णय घेतला होता, असे मुश्रीफ म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवार गटाकडून आज बीडमध्ये शक्तिप्रदर्शन; एकाच व्हॅनमधून 9 मंत्री सभास्थळी दाखल होणार

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *