उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का: मुंबईतील 3 नेत्यांचा खासदार कीर्तिकरांच्या उपस्थितीत CM शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; पाहा आकडा

मुंबई40 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या ठाकरे गटातील 3 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. हे तिघेही मुंबईच्या जोगेश्वरी भागातील सक्रीय पदाधिकारी आहेत. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसल्याची चर्चा आहे.

Related News

यासंबंधीच्या वृत्तानुसार, जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक 73 चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे व प्रभाग क्रमांक 88 च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांनी मंगळवारी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला.

मुंबईत आतापर्यंत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या तब्बल 33 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. नव्या 3 माजी नगरसेवकांच्या समावेशामुळे हा आकडा आता 36 वर पोहोचला आहे.

100 हून अधिक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

उल्लेखनीय बाब म्हणजे जोगेश्वरी, वर्सोवा व विलेपार्ले विभागातील 100 हून अधिक पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेंनी या सर्वांचे पक्षात स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतील रखडलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला गती देऊन मुंबईबाहेर पडलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

गतवर्षी झाली होती सर्वात मोठी बंडखोरी

दरम्यान, गतवर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली होती. हे सर्वजण सूरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले होते. या घटनाक्रमामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली होती. विशेषतः ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याच्या बळावर महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला. त्यांचा दावा संख्याबळाच्या आधारावर निवडणूक आयोगाने मान्य करून त्यांच्या हातात शिवसेना सुपूर्द केली.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *