Viral Video : गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरच्या अफेयरच्या जोरदार चर्चा रंगली आहे. युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री (Dhanashree Verma) सोबतही त्याचं नाव जोडलं गेलं. श्रेयस नाव अनेकदा कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीशी जोडलं जातं आहे. त्याचा खेळासोबतच वैयक्तित आयुष्यामुळेही तो कायम चर्चेत असतो.
तरदुसरीकडे धनश्रीचं (Dhanashree Verma) टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) सोबतचा फोटो नुकताच व्हायरल झाला. त्यानंतर आता श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (After Dhanashree Verma Shreyas Iyer with amitabh bachchan granddaughter navya naveli nanda Video Viral on Social media Trending news)
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बी टाऊनच्या दिग्गज अभिनेताच्या नातीसोबत दिसला आहे. बॉलिवूड बादशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदासोबत दिसतोय. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
Related News
‘मी आजपर्यंत कधीच सांगितलेलं नाही, पण…’, श्रीसंतने केला धोनीबद्दलचा खुलासा
…तर गालावर वळ उठतील; मराठी महिलेला कार्यालय नाकारल्याच्या प्रकारावर राज ठाकरेंचा इशारा
ऋषभ पंतच्या खांद्यावर तो हात कोणाचा होता? अखेर 4 वर्षांनंतर मयंक अग्रवालकडून रहस्याचा खुलासा
World Cup: शेवटच्या क्षणी वर्ल्डकपच्या टीममध्ये 2 मोठे बदल; ‘या’ खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता!
विश्वचषक संघात अक्षरच्या जागी अश्विनची एंट्री: पटेल दुखापतीमुळे बाहेर; भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध
World Cup: ज्या संघाकडून आधी खेळला नंतर त्यालाच पराभूत करत ठरला Man Of The Match
वर्ल्डकप आधी मोठा वाद! रोहितचं उदाहरण देत 25 शतकं झळकावणाऱ्याची संघातून हकालपट्टी
‘त्या’ 550 कोटींमुळे पाकिस्तानी संघ थेट भारतात न येता Via Dubai आला; जाणून घ्या कारण
World Cup 2023: ‘आम्हाला सर्वात जास्त…’ भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी
World Cup 2023: ‘एक वाईट सामना अन् त्याला….’, बुमराहबद्दल कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान
IND vs AUS: रोहित शर्माची एक चूक आणि…; कर्णधाराच्या ‘त्या’ निर्णयाने टीम इंडियावर पराभवाची नामुष्की
Glenn Maxwell Catch : पापणी पण लवली नाय अन् मॅक्सवेलने घेतला खतरनाक कॅच; पाहा Video
सध्या त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या धडाकेबाज फलंदाजाचा या व्हिडीओनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खरं तर, काही दिवसांपूर्वी श्रेयस अय्यर एखा कार्यक्रमात गेला होता. या कार्यक्रमाला अनेक प्रसिद्ध लोक उपस्थित होते. याठिकाणी श्रेयस अय्यर तर होताच आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाही उपस्थित होती.
याच कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. श्रेयस अय्यरचा हा व्हिडीओ पाहून यूजर्स अवाक् झाले आहे. एका यूजर्सने तर एवढंही विचारलं आहे धनश्रीला सोडून श्रेयस अय्यर नव्या नवेलीच्या प्रेमात पडला असल्याचं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री आणि श्रेयस अय्यर यांच्या नात्याबद्दल अफवा उडाली होती. आता या व्हिडीओनंतर चाहते हैराण झाले आहेत. दरम्यान आशिया चषक 2023 पर्यंत श्रेयस अय्यर तंदुरुस्त होणार नाही, असं अनेक वृत्तांत म्हणं आहे. त्यासोबत तो या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो.