अ‍ॅपल कंपनी मोबाईलचे बनावट सुटे भाग विक्री प्रकरण: चार आरोपींना अटक, 887 लाखांचा माल जप्त

नागपूर10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अ‍ॅपल कंपनीच्या मोबाईलचे चार्जर, अ‍ॅडाप्टर आदी बनावट सुटे भाग विकणाऱ्या चार जणांना अटक करून बर्डी पोलिसांनी त्यांच्याजवळून 87 लाख 59 हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. अजय शितलदास माखीजानी (वय 43), भूषण राधाकिशन गेहानी (वय 52), मनोज रमेशलाल धनराजानी (वय 49) व साहील विनोदकुमार बजाज (वय 21) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. कंपनीचे मुंबई येथील प्रतिनिधी यशवंत शिवाजी मोहिते (वय 42) यांनी बर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Related News

यशवंत मोहिते यांनी मिळालेल्या माहिती वरून मोदी नं 03 येथे जाऊन प्रत्यक्ष पाहाणी केली असता काही दुकानदार हे अ‍ॅपल आयफोनचे चार्जर ॲडाप्टर, युएसबी केबल, एअर पॉड, मॅक बुक व आयपॅड केस कव्हर, मोबाइल कव्हर या बनावट सुटे भागाची विक्री करीत असल्याचे आढळले. पोलीस पथक, फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोदी नं 03 येथे जाऊन गणेश मोबाईल, प्रथम मोबाईल, लक्ष्मीनारायण मोबाईल शॉप नं 05 येथे जाऊन दुकान मालक शितलदास माखीजानी यांच्या ताब्यातून एकुण 43,47,100 रूपये, भूषण राधाकिशन गेहानी यांच्या ताब्यातून 5,90,300 रूपये, मनोज रमेशलाल धनराजानी यांच्या ताब्यातून 14,78,600 रूपये आणि साहील विनोदकुमार बजाज याच्याकडून 23,43,000 रूपये किंमतीचा बनावट माल, उत्पादनाची हुबेहुब नक्कल व रंगसंगती असलेले सुटे भाग जप्त केले. कोणत्याही स्वामित्व हक्कांचा कायदेशीर अधिकार नसताना आरोपींनी 87,59,000 हजार रूपयांचा माल जप्त केला.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *