राज्याच्या जलसंपदा विभागात बंपर भरती, तुमच्या जिल्ह्यातील नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Jalsampada Vibhag Bharti 2023: सरकारी नोकरी करावी अशी अनेकांची इच्छा असते. पण आपल्याला याबद्दल माहिती नव्हती, अशी अनेकांची तक्रार असते. आम्ही तुमच्यासाठी सरकारी नोकऱ्यांचे विविध पर्याय घेऊन येत असतो. येथे अर्ज करुन तुम्ही पदानुसार चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवू शकता. महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागात 100, 200 नव्हे तर तब्बल 4 हजार 
497 पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, याठिकामी वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक पदे भरली जाणार आहेत. 

या विविध पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. या पदाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

Related News

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 25 हजार 500 ते 1 लाख 42 हजार 400 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. यासोबत त्यांना सरकारी नियमानुसार महागाई भत्ता आणि इतर भत्तेदेखील दिला जाणार आहे. 

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. जलसंपदा विभागातील भरतीची अर्ज प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून सुरु होत असून उमेदवारांना 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 

मंत्रिमंडळ सचिवालयात शेकडो पदांची भरती, सरकारी नोकरी आणि 90 हजारपर्यंत पगार

उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. यासाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास, चुकीची कागदपत्रे आढळल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *