विराट कोहली जितक्या धावा ठोकेल तेवढं डिस्काउंट, बिर्याणी चक्क 7 रुपयाला!

Virat Kohli fan gives discount on biryani : टीम इंडियाची रनमशिन म्हणजेच विराट कोहली (Virat Kohli) यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) खोऱ्याने धावा काढत आहे. फक्त 7 सामन्यात विराट कोहलीने 442 धावा केल्या आहे. त्यामुळे सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झालाय. अशातच विराटच्या कामगिरीमुळे आता कोहलीच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. विराट यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दोन शतक ठोकून सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आता कोहलीच्या एक जबरा फॅन (Virat Kohli fan) समोर आला आहे. युपीमध्ये राहणाऱ्या एका फॅनने ग्राहकांना भन्नाट ऑफर दिली आहे.

मुझफ्फरनगरमध्ये (Muzaffarnagar) एका मांसाहारी बिर्याणी विक्रेत्याला विराट कोहलीची कमालीची क्रेझ होती. गुरुवारी भारत-श्रीलंका सामन्यात कोहलीने 88 धावांची भन्नाट खेळी केली. कोहलीच्या 88 धावांमुळे खूश झालेल्या एका दुकानदाराने 60 रुपये किमतीची चिकन बिर्याणीची (Chicken biryani) प्लेट अवघ्या 7 रुपयांना विकल्याचं पहायला मिळालं आहे. कोहली जेवढे रन करेल, तेवढं डिस्काऊंट बिर्याणीवर (discount on Biryani price) देणार असा भला मोठा पोस्टर या पठ्ठ्याने छापला होता. त्यामुळे बिर्याणीच्या किमतीत 88% सूट देण्यात आली.

विराट कोहलीच्या फॅनला मकबूल बिर्याणीची ऑफर, कोहलीच्या जितक्या धावा मोजल्या जातील, तितकीच तुम्हाला बिर्याणीवर सूट मिळेल, असं दुकानदाराने दुकानाबाहेर बॅनर लावला होता. त्यानंतर हॉटेलवर चाहत्यांची रांग लागली. काहींनी आधिच बुकींग करून ठेवलं होतं. विराटने देखील खवय्यांना निराश केलं नाही अन् 88 धावांची तुफानी खेळी केली. विराटच्या कामगिरीने चाहते खुश झाले अन् 60 रुपयांची बिर्याणी फक्त 7 रुपयात खायला मिळाली.

Related News

आणखी वाचा – ‘मी मोठ्याने आऊट म्हणू शकतो पण…’, गाझा पट्टीतील मुलांसाठी इरफान पठाणची भावूक पोस्ट!

दरम्यान, विश्वचषकातील कोणत्याही संघासोबत भारताचा सामना लाइव्ह असेल तेव्हा आमची ऑफर सुरूच राहील. आम्हाला फक्त विराट कोहलीने दुहेरी शतक झळकावायचे आहे, त्यावेळी प्रत्येकाला 2 प्लेट खायला मिळतील. जवळपास बर्‍याच लोकांनी त्यांच्या ऑफरचा लाभ घेतला आणि उर्वरित काही लोक शुक्रवारी येऊन सवलतीत बिर्याणी खरेदी करू शकतील, असं दुकानाचे मालक मोहम्मद दानिश रिझवान म्हणाले आहेत.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *