दोन वर्ष घरातच कैद होती ८ वर्षांची मुलगी, सुटका होताच अवस्था पाहून नागपूर पोलीसही हळहळले

पराग ढोबळे, झी मीडिया

Nagpur News: नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दाम्पत्याने अंदाजे आठ ते दहा वर्षे वयाच्या चिमुकलीला घरात डांबून तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चिमुकलीला घरात डांबून तिच्याकडून घरातील कामे करुन घेत असतं. तसंच, तिला चटके देत शारीरिक त्रास देण्यात आल्याचा संतापजनक आणि चिड आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. (Nagpur Crime News)

शेजारच्यांनी या प्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपासून दाम्पत्य चिमुकलीकडून घरकाम करून घेत होते. तसंच, तिला विनाकारण बेदम मारहाणही करण्यात आली होती. चिमुकलीच्या संपूर्ण शरीरावर चटके दिल्याच्या जखमा दिसत होत्या. मुलीला इतका अमानुषपणे त्रास दिलेल्या दाम्पत्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Related News

शेजाऱ्यांनी उघडकीस आली घटना

काही दिवसांपूर्वी या दाम्पत्याच्या कचाट्यातून सुटून खिडकीबाहेर आली होती. त्यावेळी तिथे असलेल्या शेजाऱ्यांना तिने तिच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. शेजाऱ्यांनी मुलीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लगेचच चाइल्ड लाइन संस्थेच्या माध्यमात तक्रार केली. त्यानंतर या सगळ्या घटनेचा तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन वर्षांपासून हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतल अथर्व नगरी तीन मध्ये एक दाम्पत्य भाड्याने राहत होते. त्यांच्या घरात अंदाजे आठ ते दहा वर्ष वयाची ही चिमुकली साधारण दोन वर्षांपासून राहत होती. ती मुलगी कोण आहे व कुठून आणली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मुलीच या दाम्पत्याशी काय नात आहे. याचाही शोध अद्याप लागलेला नाही. 

बाथरुममध्ये ठेवले होतो कोंडून

मागील चार-पाच दिवसांपासून कुटुंबीय बाहेर गेल्याने त्यांनी चिमुकलीला घरातील बाथरूममध्ये कोंडून ठेवलेलं होतं. तिथून ती कशीबशी सुटून घराच्या खिडकीमधून बाहेर पडली. त्यानंतर तिने ही सगळी हकीगत शेजारच्या कुटुंबीयांना सांगितली. तिच्या शरीरावर प्रत्येक भागावर गरम तव्याच्या, सिगारेटच्या चटके दिल्याच्या खुणा पाहून शेजारच्यांचे मन हेलावून गेलं. पोलिसांनी या मुलीवर अत्याचार करणाऱ्या दांपत्याला शोधून कठोर कारवाईची मागणी केली.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *