ठाण्यात खळबळ! नराधम वडिलांचा लेकीवर बलात्कार, गुन्हा दाखल होताच घेतला टोकाचा निर्णय

Minor Girl Rape Case In Thane: ठाण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नराधम बापाने पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईला हा प्रकार समजताच तिने पोलिसात धाव घेत बापाविरोधात तक्रार दाखल केली मात्र, तक्रार दाखल झाल्याचे कळताच नारधमाने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे, 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ही घटना घडली आहे. पीडितेची आई ही दुबईला असते तर वडिल रिक्षाचालक आहे. दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. मात्र दोघांत सतत वाद व्हायचे. आरोपी घराकडे दुर्लक्ष करायचा याच कारणामुळं पीडीतेची आई दुबईला कामानिमित्त राहत होती. तर, दोन मुलांची जबाबदारी नवऱ्यावर सोपवली होती. 

सहा महिने तरुणीवर अत्याचार 

पीडित अल्पवयीन तरुणीची आई दुबईला कामानिमित्त असताना आरोपी बापाने 26 जुलै 2022 ते 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपल्याच मुलीवर वारंवार अत्याचार केले. गेल्या सहा महिन्यांपासून तो तिच्यावर बलात्कार करत होता. तसंच, मुलीला कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. सहा महिने पीडित मुलगी हा त्रास सहन करत होती. 

Related News

आजीशी बोलताना सत्य समोर आलं 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अल्पवयीन तरुणी तिच्या आजीकडे गेली होती. मात्र तिथे ती सातत्याने आजारी पडत होती. त्यामुळं तिला कारण विचारताच तिने घडलेला सगळा प्रकार आजीला सांगितला. आजीने तात्काळ ही घटना पीडितेच्या आईला सांगितली. पीडितेची आई दुबईहून परतल्यानंतर बदलापूर स्थानकात धाव घेतली व मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. 26 ऑक्टोबर 2023 रोजी नराधमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रार दाखल होताच आरोपीने रेल्वे रुळाखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांना रेल्वे रुळावर आरोपी बापाचा मृतदेह आढळला आहे. 

गुन्हा दाखल होताच रेल्वेखाली आत्महत्या 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या तक्रारीवरुन 26 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करत बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपी वडिलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी आरोपीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *