Ashes 2023: शेवटच्या सामन्यात इंग्लंडने केली ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नाची ‘राख’; स्टुअर्ट ब्रॉडचा शेवट गोड!

Ashes 2023, England vs Australia: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS 5th Test) यांच्या खेळलेल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात इंग्लंडने दणक्यात विजय मिळवला. त्यामुळे आता मानाची अॅशेस (Ashes 2023) मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली आहे. शेवटची विकेट घेत स्टुअर्ट ब्रॉडचा (Stuart Broad)  शेवट देखील गोड झाला आहे. नुकतंच स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती (Stuart Broad Retirement) जाहीर केली होती. शेवटच्या दिवशी दोन विकेट घेत स्टुअर्ट ब्रॉडने कांगारूंची दैना उडवली. इंग्लंडने हा थरारक सामना 49 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे आता इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांची राख केली, असं म्हणावं लागेल. 

अॅशेस मालिका कशी होती?

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यांत पहिला सामना हा बर्मिंगघम इथे खेळवण्यात आला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने जिंकत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला धुळ चारली आणि 2-0 ने आघाडी घेतली होती. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं अन् तिसरा सामना जिंकला. त्यामुळे मालिकेतील चुरस आणखी वाढली होती. मात्र, चौथ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या स्वप्नाची ‘राख’ झाली.

कशी होती ब्रॉडची टेस्टमधील कारकीर्द?

स्टुअर्ट ब्रॉडने 2007 टेस्टमध्ये डेब्यू केलं होतं. त्याने पहिला टेस्ट सामना हा श्रीलंकेविरूद्ध खेळला होता. फलंदाजीच्या जोरावर त्याने 243 डावात 3,656 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1 शतक आणि 13 अर्धशतके आहेत. त्याच्या करियरमध्ये त्याने 20 वेळा 5 विकेट्स घेतल्या असून 3 वेळा 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. त्याने 243 डावात 3,656 रन्स केलेत. याशिवाय त्याच्या नावे 1 शतक आणि 13 अर्धशतके आहेत.

आणखी वाचा – Stuart Broad Retirement: स्टुअर्ड ब्रॉडचा क्रिकेटला अलविदा!

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन  

इंग्लंड 

बेन स्टोक्स (C), बॅन डकॅट, झॅक क्राउली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (WK), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन.

ऑस्ट्रेलिया 

पॅट कमिन्स (C), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (WK), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड टॉड मर्फी, स्कॉट बोलँड, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर आणि जोश इंग्लिश.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *